Women's Day | परगावात नोकरी करणाऱ्या महिलांना मुलांसह राहाण्यासाठी सरकार देणार जागा sakhi niwas scheme for working women and their children hostel for women | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Day

Women's Day : परगावात नोकरी करणाऱ्या महिलांना मुलांसह राहाण्यासाठी सरकार देणार जागा

मुंबई : भारत सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवते. सखी निवास योजना ही यापैकी एक योजना आहे. या योजनेत नोकरदार महिलांना वसतिगृहाची सुविधा दिली जाते.

या योजनेअंतर्गत वसतिगृह सुविधेचा लाभ कोण घेऊ शकतो आणि नोंदणीशी संबंधित सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी संपूर्ण लेख वाचा. (sakhi niwas scheme for working women)

सखी निवास योजना

भारतातील विविध प्रदेशात सखी निवास योजनेअंतर्गत वसतिगृहाची सुविधा भाड्याने दिली जाते. या वसतिगृहात फक्त नोकरदार महिला आणि त्यांच्या मुलांना राहाण्याची परवानगी आहे.

अनेक महिला घरापासून दूर असलेल्या शहरांमध्ये काम करतात, त्यांना सुरक्षितता देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना कार्यरत महिला वसतिगृह म्हणून ओळखली जात होती. (hostel for women) हेही वाचा - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

मुले किती वयापर्यंत एकत्र राहू शकतात ?

सखी निवास योजनेंतर्गत, जर स्त्री विवाहित असेल, तर ती तिच्या १८ वर्षांपर्यंतच्या मुलीला आणि १२ वर्षांपर्यंतच्या मुलाला या ठिकाणी आपल्यासोबत ठेवू शकते. अनेकवेळा मुलंही आईसोबत इतर ठिकाणी राहातात, हे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

सखी निवास कोणत्या राज्यात आहे ?

महिला मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या प्रेस रिलीझनुसार, देशात ४९४ कार्यरत महिला वसतिगृहे आहेत ज्यात मुलांसाठी डे केअर सुविधा आहे. या योजनेची सुविधा गोवा, दिल्ली, नागालँड, आंध्र प्रदेश, बिहार आणि आसामसह अनेक राज्यांमध्ये दिली जात आहे.

अर्ज कसा करायचा ?

शहरांमध्ये ज्यांचे उत्पन्न दरमहा रु. ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाशी संपर्क साधू शकता. या दरम्यान, तुम्हाला पुराव्याच्या स्वरूपात अनेक वैयक्तिक कागदपत्रे सादर करावी लागतील.