Family Time : ‘चल, गप्पा मारू!’

family communication tips : समुपदेशक सावनी देशपांडे यांच्या मते मोबाईल-ओटीटीमुळे कुटुंबीयांत संवाद कमी झाला आहे. मनमोकळ्या गप्पा मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असून ताणतणाव कमी करतात, विचार स्पष्ट करतात आणि नात्यांमध्ये आत्मीयता वाढवतात.
family communication tips

family communication tips

sakal

Updated on

सावनी देशपांडे- समुपदेशक

हल्ली एकाच कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींनाही एकमेकांशी निवांत बोलण्यासाठी वेळ मिळणे आणि वेळ काढणे अवघड झाले आहे असे दिसते. सुट्टीच्या दिवशी किंवा थोडा मोकळा वेळ मिळाला की सगळ्यांना स्वतःचे मनोरंजन विविध प्रकारांनी करायचे असते. उदा. मोबाइल, ओटीटी पाहणे. पूर्वी लोक रोज घरातल्यांशी, शेजारच्यांशी, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारायचे, ते आता कमी झाले आहे. मोबाईल आणि प्रगत तंत्रज्ञान यांच्याआधी खूप कमी घरांत टीव्ही, केबल असायचा. त्यामुळे थोडा वेळ टीव्ही बघून इतर वेगवेगळ्या गोष्टी लोक करत होते.

खरेतर हलक्याफुलक्या गप्पा आणि विविध विषयांवर आपल्या आवडीच्या व्यक्तींबरोबर बोलणे ही मानसिक स्वास्थ्यासाठी खूप उपयोगी गोष्ट आहे.सध्याच्या धावपळीच्या युगात आपण सतत वेळेमागे धावत असतो. परंतु स्वतःसाठी वेळ काढणे आणि आपल्या मनात साचलेल्या गोष्टी एकमेकांशी बोलणे आज खूप गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com