

Balancing Ambition with Personal Capability: Lessons from Dnyaneshwari
Sakal
भागवत साळुंके (आळंदी)
जीवसृष्टीत पशू, पक्षी, कृमी अन् कीटक यांपेक्षा मनुष्य वेगळ्या स्वरूपाचा जीव आहे. इतरांच्या तुलनेत भौतिक जगात माणूस विशेष आहे. आपल्या ठायी असलेल्या बौद्धिक सामर्थ्यावर भौतिक जगात बरेच बदल माणूस करू शकला; मानवेतरांना ते शक्य नाही. उदाहरणार्थ, शेकडो वर्षांपूर्वी मधमाश्या अथवा मुंग्यांच्या कामकाजाची जी शैली होती, आजही ती तशीच आहे. मात्र, गेल्या शतकातल्या मानवी व्यवहारात प्रचंड परिवर्तन झाले आहे.