
Marathi Gudi Padwa messages: हिंदू धर्मात गुढी पाडव्याला खुप महत्व आहे. राज्यात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यंदा गुढी पाडवा ३० मार्चला साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त घरोघरी गोड पदार्थ बनवले जातात, तसेच घरासमोर गुढी उभारली जाते. सर्वत्र चैतन्यमय वातावरण असते. या सणाचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी मराठीतून खास शुभेच्छा पाठवू शकता.