फॅशन टशन :  सेलिब्रिटी लूकसाठी सिक्वेन साडी

फॅशन टशन :  सेलिब्रिटी लूकसाठी सिक्वेन साडी

वीकएण्डला रिसेप्शन किंवा कॉकटेल पार्टीचा प्लॅन करताय का? मी आज तुम्हाला ‘सिक्वेन साडी’ हा भन्नाट पर्याय सुचविणार आहे. ही साडी घातल्यावर तुम्हाला सेलिब्रिटीसारखाचा फील येईल हे नक्की. हे नाव युनिक असलं, तरी या साडीनं बी-टाऊन गर्ल्सला भुरळ घातली आहे. 

काही वर्षांपूर्वी साडीचं नाव ऐकलं, तरी मुली नाक मुरडायच्या. मात्र अलीकडं साडीची क्रेझ वाढत आहे. ही साडी पारंपरिक असूनही सदाबहार आहे. कॉलेजमध्ये एखादा इव्हेंट असूदेत किंवा लग्न, रिसेप्शन, कॉकटेल पार्टीत एलिगंट लूकसाठी साडीचा पर्याय सहज निवडला जातो. सध्या मार्केटमध्ये सिक्वेन साडीनं एन्ट्री केली आहे. संपूर्ण साडीवर नाजूक टिकली वर्क केलेलं असतं. सिव्हलेस ब्लाऊज यावर भन्नाट दिसतो. काजोल, नुसरत बरोचा, भूमी पेडणेकर, जानव्ही कपूर यांना नुकतंच या साडी लूकमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे. नेहमीपेक्षा हटके लूक ट्राय करायचा असल्यास हा पॅटर्न नक्कीच ट्राय करून बघा. यात विविध प्रकारचे रंग उपलब्ध आहेत आणि या साड्यांची रेंज तशी खिशाला परवडणारी आहे. या साड्या ऑनलाइन मार्केटमध्ये हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. 

लूक कूल
या साडीवर सिव्हलेस ब्लाऊज छान दिसेल. 
न्यूड मेकअप यावर जाईल. 
कानात किंवा गळ्यात ज्वेलरी नाही घातली, तरी चालेल. 
केस मोकळे किंवा पोनी घाला. 
हाय हिल्स यावर भारी दिसतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com