
डाॅ अलका गुडधे
शारदा उद्योग मंदिर ही संस्था ७५ वर्षांपासून अमरावती इथं उत्तमरित्या काम करत आहे. संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे महिलांनी चालवलेली ही संस्था. कार्यकारी मंडळातही फक्त महिला असून, त्यांनी या संस्थेचा आलेख कायम चढता ठेवलाय. नावीन्याचा ध्यास घेऊन सतत संस्थेच्या प्रगतीचा विचार करणाऱ्या अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंडळामुळे संस्थेचा दर्जा अव्याहतपणे वाढताना दिसतो.