शूटिंग करत असताना रोज वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागत. नवनवीन लोक, नवीन वातावरण, नवीन जागा या सगळ्यांमध्ये सामावून कसं घ्यायचं, असा पेच असतो. ‘अभिनय करणं’ हे मुख्य काम असेल, तरी या बाकीच्या आव्हानात्मक गोष्टी अटळ असतात..अशावेळी सांभाळून घेण्यापेक्षा कमी तक्रारींमध्ये आपलं काम कसं पूर्ण होऊ शकेल या गोष्टीकडे माझा जास्त कल असतो. स्वतःला कम्फर्टेबल करणं हा विचार केला, तर निम्म्याहून अधिक ऊर्जा जमवाजमवीमध्ये जाते. त्यापेक्षा आपलं ध्येय हे ‘आपल्याकडून उत्तम काम होणं हे आहे’, याची स्पष्टता असेल, तर आपसूक मध्ये वाटणारे अडथळे नगण्य वाटू लागतात.मग तक्रार न करता, अवास्तव अपेक्षा न करता आपोआप सगळं सुरळीत पार पडतं. खरंतर ॲक्टरच्या फेवरमध्ये काही गोष्टी असल्या, तर सर्वसाधारणपणे काम सोप्पं होऊ शकतं; परंतु अशी परिस्थिती वाट्याला येणं म्हणजे भाग्यच..बऱ्याचदा पॅकअप वेळेत होणं ही सर्वसाधारण अपेक्षा असते; परंतु ऐन वेळी असिस्टंट डिरेक्टर येऊन सांगतात, की अमुक कलाकारांच्या पुढच्या तारखा नसल्यानं आपल्याला आज रात्रभर शूट करावं लागणार आहे. बऱ्याचदा वेळेत पोहोचलो तरी लवकर सीन न लावल्यामुळे तासन्तास बसून राहावं लागतं. अशा गोष्टी तांत्रिक असल्या, तरी समजून घ्याव्या लागतात.बऱ्याचदा तर आम्ही चित्रपट, सिरीयलमध्ये घालतो ते ड्रेस, ब्लाऊज किंवा अन्य पेहराव माप देऊनही तसे शिवले गेलेले नसतात. आणखीन वाईट गोष्ट म्हणजे बऱ्याचदा कित्येक एपिसोड वापरलेले कपडे अशक्य वास येत असला तरीही तसेच घालावे लागतात. अर्थात ‘शो मस्ट गो ऑन’..काही वर्षांपूर्वी मी एक सिरीयल करत होते, त्यामध्ये माझा लूक श्रीमंत असणं अपेक्षित होतं. प्रॉडक्शननं आणलेल्या साड्या मात्र हलक्या मटेरियलच्या होत्या. मात्र, आमच्या हुशार ड्रेस डिझायनरनं साडी आणि ब्लाऊजची रंगसंगती आणि उत्तम दागिने यांची इतकी कमाल केलीकी, ते पडद्यावर चक्क महाग असल्यासारखं वाटत होतं.अशा या आभासी जगात काम केल्यामुळे अडचणीतून काय उपाय निघू शकतो अशा गोष्टी शिकायला मात्र मिळाल्या. बऱ्याच जणींना प्रश्न पडतो, की मॅचिंग करावं, की मिस मॅच करावं? बऱ्याचदा साडीमध्ये असलेल्या ब्लाऊज पीसचे ब्लाऊज शिवायला आजकाल कोणालाही आवडत नाही..अशा वेळेला काय युक्ती करू शकतो? मॅचिंगच ठेवलं तर आणखी कलात्मक लूक कसा तयार होईल याबाबतीत थोडंसं जाणून घेणं गरजेचं असतं. मुळात मॅचिंग स्टाईल करायची असेल तर औपचारिक कार्यक्रम, elegant look mini, minimalist style साठी योग्य ठरू शकतो.उदाहरणार्थ, बॅग, शूज, पोशाखाच्या रंगसंगती एकसारख्या असण्यामुळे तुम्ही नीटनेटके, सभ्य, क्लासिक दिसता; परंतु विरुद्ध रंग वापरले तर आकर्षक दिसू शकता. अनौपचारिक भेटगाठींसाठी, क्रिएटिव्ह फील्डमध्ये हटके फॅशनसाठी मिसमॅच करू शकता. यामध्ये ट्रेंडी, धाडसी व्यक्तिमत्व दिसू शकतं..1) मॅचिंग करायचं ठरवलं, तर कानातले, नेल पॉलिश किंवा अंगठी यांच्यामध्ये एकसंगती ठेवा- मग ते बनावटी वाटणार नाहीत.2) वेगळेपणा उठून दिसावा असं वाटत असेल, तर एखादी हटके पर्स, स्टेटमेंट शूज, मोठे कानातले यांच्यावर ठळकपणे लक्ष द्या. उरलेले आऊटफिट साधे किंवा क्लासिक ठेवा. यामध्ये मॅचिंग गोष्टी वापरू शकता..3) तुम्ही संपूर्ण काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालणार असाल, तर लेदर, सिल्क, लिनन किंवा डेनिम यांसारखे भिन्न फॅब्रिक्स वापरा. यामुळे कोणताही अतिरिक्त रंग न वापरता या लूकमध्ये उठा आणि डौल येतो.4) मूडनुसार लूक ठरवा. फक्त कॉफीसाठी बाहेर पडत असला, तरी आतून पावरफुल वाटत असेल, तर ब्लेझर, बोल्ड लिपस्टिक आणि शार्प सनग्लासेस घाला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.