
जेवल्यानंतर लगेच आंघोळ करण्यास घरातील मोठे लोक अनेकदा नकार देतात. असे म्हणतात की जेवल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने पोटदुखीबरोबरच पचनाच्या समस्याही होतात.
यामागे खरंच काही तर्क आहे का, असा प्रश्न पडतो.ओन्ली माय हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, तुम्ही न घाबरता आरामात जेवल्यानंतर लगेच आंघोळ करू शकता. यामुळे तुम्हाला पोटाचा कोणताही त्रास होणार नाही.
खाल्ल्यानंतर आंघोळ करणे धोकादायक का मानले जाते?
तुम्हाला हवे तसे तुम्ही आंघोळ करू शकता. बादलीत पाणी भरून, शॉवर किंवा बाथटब वापरून. पण जर तुमची तब्येत आधीच खराब असेल तर त्रास होऊ शकतो. अन्न खाल्ल्यानंतर अनेकदा अपचन होते.
एक गोष्ट लक्षात ठेवा अन्न खाल्ल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करू नका. जेवल्यावर स्विमिंग अजिबात करू नये. कारण अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमुळे तुमचे पचन बिघडू शकते.
अन्न खाल्ल्यानंतर आंघोळ केल्याने रक्ताभिसरण बिघडते. एवढेच नाही तर पचनसंस्थेत रक्ताची कमतरता होऊ शकते. त्यामुळे अपचन, पोटात दुखणे, जडपणा आणि इतर समस्याही उद्भवू शकतात.
खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने हे रिऍक्शन होते
आंघोळीमुळे हायपरथर्मिक रिऍक्शन होते. जे शरीराचे अंतर्गत तापमान एक किंवा दोन अंशांनी वाढवते आणि शरीरासाठी फायदेशीर ठरते. हे केवळ रक्ताभिसरण सुधारत नाही तर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. शरीरातील टॉक्सिक किंवा घाण बाहेर काढण्यास देखील मदत करते.
खाल्ल्यानंतर शरीराचे तापमान आधीच वाढलेले असतात. त्यामुळे पचनसंस्थेतील रक्ताभिसरण वाढते. तर्क असा आहे की जेवल्यानंतर आंघोळ केल्याने तुमचे शरीर कनफ्यूज होते आणि पचनसंस्थेमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढण्याऐवजी ते इतर अवयवांमध्ये जाते. त्यामुळे पचनक्रिया विस्कळीत होते.
जेवल्यानंतर लगेच थंड पाण्याने अंघोळ करू नये
थंड शॉवर घेतल्याने शरीराचे तापमान बदलू शकते आणि रक्तवाहिन्या संकुचित होऊ शकतात. त्यामुळे योग्य रक्तप्रवाहात व्यत्यय येऊ शकतो.
दुसरीकडे, गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार आणि कमी रक्तदाब यामुळे हृदय गती वाढू शकते आणि चक्कर येऊ शकते. त्यामुळे, पाण्याचे तापमान कितीही असो, खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
आंघोळीनंतर किती तासांनी आंघोळ करावी
अन्न खाल्ल्यानंतर साधारण तासभरानंतरच आंघोळ करावी. शरीराला योग्य पचनासाठी आपल्या पोटात ऊर्जा आणि मजबूत रक्त प्रवाह आवश्यक आहे. आंघोळ केल्याने या प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो कारण शरीर तापमान नियंत्रित करण्यासाठी रक्त प्रवाह तुमच्या अवयवांकडे वळवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.