
भगवान शंकराच्या भक्तीचा पवित्र दिवस मराठी शुभेच्छांनी साजरा करा.
मित्र आणि परिवाराला मराठीतून हृदयस्पर्शी शुभेच्छा पाठवून आनंद वाटा.
श्रावणातील सोमवार भक्ती आणि प्रेमाने मराठी संदेशाद्वारे अधिक खास बनवा.
Shravan Somwar 2025 Marathi devotional wishes: श्रावण हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि भक्तिमय महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार, म्हणजेच ‘श्रावणी सोमवार’, भगवान शंकराच्या भक्तीला समर्पित असतो. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला साजला केला जाणार आहे. या दिवशी भक्त शिवलिंगावर बेलाचे पानं, दूध आणि जल अर्पण करतात आणि महादेवाची मनोभावे पूजा करतात. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मित्र आणि परिवाराला मराठीतून भक्तिमय शुभेच्छा पाठवून तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकता. या शुभेच्छा भक्ती आणि प्रेमाचा संदेश देतात, ज्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतात.