
थोडक्यात:
श्रावणात ऑफिससाठी पारंपरिक पोशाखांचा ट्रेंडी आणि व्यावसायिक लूक सहज साधता येतो.
कॉटन कुर्ती, सिल्क साडी, कॉ-ऑर्ड सेट, व स्ट्रेट कट कुर्ता हे पर्याय सौंदर्य आणि सोईचा उत्तम समन्वय साधतात.
योग्य रंग, अॅक्सेसरीज आणि साधेपणा पाळून ऑफिसलूक अधिक उठून दिसतो
Traditional Office Outfits: श्रावण म्हटलं की सणांची रेलचेल, पूजाअर्चा, पारंपरिक पोशाख आणि रंगांची उधळण! पण ऑफिसमध्ये दररोज नेहमीचं फॉर्मल वेअर घालून हा सण साजरा करता येतो का? नक्कीच! फक्त थोडी कल्पकता आणि योग्य कपड्यांची निवड केली, तर ऑफिसमध्येही तुम्ही पारंपरिकतेचा गंध आणि ट्रेंडी लूक सहज जपू शकता. चला, पाहूया अशा काही खास लूक आयडिया, ज्या श्रावण महिन्यात तुम्हाला देऊ शकतात पारंपरिकतेची झलक आणि कॉर्पोरेट स्टाईलची झळाळी.