
सोलापूर: नवनवीन पुस्तके वाचकांना उपलब्ध व्हावीत, खरेदी करता यावीत या उद्देशाने सैफूल येथील श्रेया कुलकर्णी यांनी पुस्तक भिशी हा उपक्रम नववर्षापासून सुरू करण्याचा संकल्प केला आहे. दर महिन्याला शंभर रुपये भरून आपल्या लकी महिन्यात बाराशे रुपयांची पुस्तके खरेदी करण्याची संधी याद्वारे पुस्तक प्रेमींना मिळणार आहे.