पॉर्न पाहण्याचे दुष्परिणाम माहितीये का?

पॉर्न बघणं किंवा न बघणं हा त्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक चॉईस आहे. मात्र....
Porn-Video
Porn-Video
Summary

पुर्वीच्या काळी लैंगिकतेविषयी कोणीच उघड बोलायचं नाही. तशी साधनंही नव्हती.

सातारा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात १६ वर्षाच्या मुलाने पाच वर्षाच्या मुलाबरोबर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यात पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू (Death) झाला. गेले काही महिने १६ वर्षाचा मुलगा मित्रांबरोबर पॉर्न व्हिडिओ (Porn Video) बघत होता. त्यातून जी उद्दीपना (Stimulus) निर्माण झाली, ती कशी हाताळायची याची त्याला कल्पना नसल्याने अशा प्रकारची गंभीर घटना घडल्याचे समोर आले. तर, ग्रॅमी पुरस्कार विजेती अमेरिकन गायिका बिली एलिश (Billie Eilish) हिने एका मुलाखतीत वयाच्या ११व्या वर्षापासून पॉर्न पाहत असल्याचा नुकताच खुलासा केला. या व्यसनामुळे तिच्या खासगी आयुष्यावर आणि रिलेशनशिप्सवर खूप वाईट परिणाम झाल्याचं तिने सांगितलं.

आजकाल अनेकांना पॉर्न पाहण्यात काहीच गैर वाटत नाही. काही ती एक मजा म्हणून बघतात. तर काहींचा पार्टनर (Partner) दूर असेल आणि भावना निर्माण झाली तर ती शमविण्यासाठी त्याचा वापर करतात. पण पॉर्न (Porn) पाहण्याला मर्यादा असावी की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्या समाजात लैंगिकता हा विषय कायमच पडद्याआड चर्चिला गेला आहे.त्यामुळे त्याच्याविषयी मोकळेपणाने माहिती दिली जात नाही. मुलं आणि मुली वयात येतात, शरिरात घडणाऱ्या बदलांमुळे त्यांना या गोष्टींविषयी आकर्षण वाटायला लागतं. पुर्वीच्या काळी लैंगिकतेविषयी कोणीच उघड बोलायचं नाही. तशी साधनंही नव्हती, असं मानसोपचार तज्ज्ञ डॉ.हमीद दाभोळकर यांनी सांगितलं.

Porn-Video
"पॉर्न पाहण्याच्या व्यसनामुळे मी उद्ध्वस्त झाले"; प्रसिद्ध गायिकेचा खुलासा
sex
sexTeam e Sakal

चुकीच्या पद्धतीने भावनांचे उद्दीपन

पॉर्न बघण्याच्या परिणामांविषयी डॉ. हमीद दाभोळकर म्हणाले की, आता, पॉर्न व्हिडिओ सहज इंटरनेटवर (Internet) उपलब्ध झाल्यामुळे त्या गोष्टी मुलं, तरुणाईपर्यंत (Youth)अत्यंत मोठ्या प्रमाणात सहज पोहोचत आहेत. पण या व्हिडिओत जे दाखवलं जातं ते एका मोठ्या व्यवसायाचा भाग आहे. काही बिलियन्समध्ये त्याची उलाढाल आहे. साईट्सवर सेक्सविषयी (Sex) शास्त्रीय माहिती मिळण्यापेक्षा एक मार्केटेबल प्रॉडक्ट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्यातून चुकीच्या पद्धतीने मुलांच्या, तरूण मुलांच्या भावना उद्दीपित होऊ शकतात. ज्यांना मुळातच लैंगितेविषयी नीट माहिती नाहिये त्यांनी पॉर्न बघून लैंगिकतेविषयी चुकीची माहिती मिळविण्यापेक्षा योग्य पद्धतीनं मोठ्यांशी चर्चा करून माहिती मिळवणं जास्त योग्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ज्या पद्धतीनं इंटरनेट, गेम्सच व्यसन लागू शकतं. तसंच पॉर्न पाहून मानवी मनाला जी उद्दीपना येते त्याचं व्यसन मुलांना, तरूण वयातल्या मुलांना लागू शकतं. जसा व्यसनाचा परिणाम होतो तसा दैनंदिन दिनक्रमावर, नातेसंबंधांवर, अभ्यासावर परिणाम व्हायला लागतो. अशावेळी अनैसर्गिक पद्धतीचे शरीरसंबध दाखवलेले असतात.

Porn-Video
..तेव्हा मला वाटलं आई पॉर्न साइट चालवते- सारा अली खान
porn
porne sakal

व्यसन लागणे धोक्याचेच

पॉर्न (porn) बघण्याचे वाढते व्यसन हे आता प्रकर्षांने समोर यायला लागले आहे. पॉर्न बघणं किंवा न बघणं हा त्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक चॉईस आहे. मात्र लहान, तरूण वयातली मुलांना त्याच्या सीमारेषा ओळखणे अडचणीचं असल्याने त्याविषयी योग्य माहिती नसल्यामुळे अनेक गोंधळ निर्माण होऊ शकतात. ज्यामध्ये थेट शोषण होते. चाईल्ड पॉर्नमध्ये तर शोषण, क्रूरपणा, गुन्हेगारी या सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्याचा परिणाम तरूण वयातल्या मुलांवर होऊ शकतो, असेही दाभोळकर यांनी सांगितले.

Porn-Video
शारीरिक - मानसिक आरोग्य जपायचंय? मग हे 9 उपाय ठरतील फायदेशीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com