
Veer Bal Divas 2024: भारतात दरवर्षी २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जातो. हा दिवस शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या चार वीर पुत्रांच्या साहसाच्या आणि अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस गुरुजींचे दोन वीरपुत्र जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या बलिदानाला समर्पित आहे. त्यावेळेस जोरावर सिंग हे ९ वर्षांचे तर फतेह सिंग हे फक्त ६ वर्षांचे होते. चला तर मग हा दिवस साजरा करण्यामागील इतिहास आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया...