मुलांच्या वागणुकीतील ही लक्षणे सांगतील तुम्ही पालक म्हणून किती यशस्वी आहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

parenting

मुलांच्या वागणुकीतील ही लक्षणे सांगतील तुम्ही पालक म्हणून किती यशस्वी आहात

मुंबई : काही पालकांना असे वाटते की जी मुले चांगली वागतात ती अशीच जन्माला येतात पण तसे नाही. तुम्ही तुमच्या मुलाच्या वर्तनाचे निरीक्षण करा आणि त्याचे वागणे योग्य आहे की नाही हे जाणून घ्या आणि जर ते नसेल तर तुम्ही कुठे चुकत आहात याचा विचार करा.

हेही वाचा: केंद्रीय गृहमंत्रालयात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याच्या नियमांत बदल

मुलाचे चांगले वागणे आणि शिष्टाचार इतर कोठूनही शिकवले जात नाहीत तर पालकांकडून शिकवले जातात. जर तुमचे मूल चांगले वागत असेल तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या नाहीतर तो निराश होऊ शकतो. त्याला असे वाटू शकते की तो सर्वकाही व्यवस्थित करत असतानाही त्याचे पालक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्याचा काही उपयोग नाही. आपल्या मुलाच्या चांगल्या वागणुकीची प्रशंसा करा आणि प्रोत्साहित करा.

मुलाच्या वागणुकीतील ही लक्षणे सांगतील तुम्ही पालक म्हणून किती यशस्वी आहात

तुमचे मूल कोणालाही भेटल्यावर हसून नमस्कार करते की आणि शाळेत किंवा उद्यानात जाताना गुडबाय करते म्हणजे तुमच्या मुलाला समजते की कुठे कोणत्या शब्दांचा वापर करावा. तुमचा मुलगा वेळेवर शाळेत जाण्यासाठी तयार होतो आणि त्याला जिथे जायचे आहे तिथे तो वेळेवर पोहोचतो. त्यामुळे मुलांना वेळेची किंमत कळते आणि त्यांच्या आयुष्यातील समस्या कमी होतात.

हेही वाचा: Batman-Supermanच्या चाहत्यांसाठी boatने आणल्या आहेत खास ऑडिओ अॅक्सेसरीज

तुमच्या मुलाचे निरीक्षण करा आणि एखादी वस्तू वापरण्यापूर्वी तो त्याच्या मित्रांकडून परवानगी घेतो का ते पाहा. जर त्याने असे केले तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचे वागणे चांगले आहे. जर तुम्ही कोणाशी बोलत असाल किंवा काही महत्त्वाचे काम करत असाल आणि तुमच्या मुलाला काही बोलायचे असेल तर तो व्यत्यय आणत नाही. असे असेल तर तुम्ही त्याच्या सवयीचे कौतुक केले पाहिजे.

काही मुले त्यांच्या पालकांना समजून घेतात आणि त्यांच्यामुळे पालकांना पाहुण्यांसमोर लाज वाटावी असे ती मुले काही करत नाहीत. जर तुमच्या मुलाची काही चूक झाली असेल आणि त्याने त्याची जबाबदारी घेतली असेल किंवा आपली चूक मान्य केली असेल तर ते चांगले लक्षण आहे. चूक करणे ही काही मोठी गोष्ट नाही. प्रत्येकजण चुका करतो हे समजून घेण्यास मुलाला मदत करा परंतु आपण नेहमी सत्य बोलले पाहिजे.

Web Title: Signs That You Are Raising A Well Behave Child Successful Parenting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :childrenparenting