esakal | मोबाईलवर स्क्रोल करताना करा व्यायाम; जाणून घ्या सोप्या ट्रिक्स| Lifestyle Tips
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईलवर स्क्रोल करताना करा व्यायाम; जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

मोबाईलवर स्क्रोल करताना करा व्यायाम; जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

sakal_logo
By
टीम ईसकाळ

सर्वांना फिट रहावे असे वाटत असते पण काही लोकांना एक्सरसाईज करताना त्रास होतो. कित्येक जणांना एक्सरसाईज करायला वेळ मिळत नाही, तर काहीजणांना एक्सरसाईज करायला मोटिव्हेशन कमी पडते. असे लोक वर्कआऊट सुरु करण्यासाठी आज-काल नवीन वर्ष केव्हा येईल याची वाट पाहतात. जर तूम्ही देखील अशा लोकांपैकी असाल तर तुमच्या साठी काही सोप्या ट्रिक्स आम्ही सांगणार आहोत. अॅक्टिव्ह राहण्यासाठी तुम्हाला जीममध्ये जायला पाहिजे असे काही नाही. तुम्ही घर बसल्या, उठता-बसता शरीर अॅक्टिव्ह ठेवू शकता.

आडवे पडलेल्या अवस्थेमध्ये करा सायकलिंग

फिट राहण्यासाठी चागंल्या आहारासोबत अॅक्टिव्ह राहणे देखील गरजेचे असते. तुम्ही जर दिवसभराचे काम करून थकून जाता तेव्हा वर्कआऊट करणे शक्य होत नाही. मग अशा वेळी शरीर अॅक्टिव्ह कसे ठेवावे. जर तुम्ही आडवे पडलेल्या अवस्थेमध्ये मोबाईलवर स्क्रोल करत असाल तर त्याच अवस्थेत तुम्ही सायकलिंग करू शकता. मोबाईलवर स्क्रोल करत करत एक्सरसाईज केल्यास तुमचे शरीर अॅक्टिव्ह राहील.

चालता चालत फोन वर बोला.

चालणे हे आरोग्यासाठी गरजेचे असते. तुम्ही जर मोबाईलवर बोलताना नेहमी चालत राहा. तुम्ही फोनवर बोलताना उठा-बस देखील करू शकता किंवा जीना खाली-वर चढू-उतरू शकता.

टिव्ही पाहताना करताना करा डीप ब्रिदींग

टिव्ही पाहताना तुम्ही बसल्या बसल्या हातांची मुव्हमेंट करू शकता. त्यासोबतच तुम्ही डीप ब्रिदींग देखील करू शकता.

तुम्हाला काही दिवस त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जेव्हा तुम्हाला या सवयी लागतील तेव्हा तुमच्यासाठी ही एक्सरसाईज करणे खूप सोपे होईल.

loading image
go to top