Valentine Day 2025 : सिंगल आहात? मग असा साजरा करा 'व्हॅलेंटाईन डे', करा या स्पेशल गोष्टी

Creative ways to enjoy Valentine's Day without a partner: सिंगल लोकांनी कसा साजरा करावा व्हॅलेंटाईन डे?
Single on Valentine's Day
Single on Valentine's Dayesakal
Updated on

14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रेमी जोडपं एकमेकांसोबत वेळ घालवतात, प्रेम व्यक्त करतात. कपल्ससाठी हा दिवस सर्वात मोठा मानला जातो. पण सिंगल लोकांचं काय? त्यांच्यासाठी तसा हा दिवस काही खास नसतो. त्यांच्या मनात काय सुरू असतं हे त्यांनाच माहीत.

पण सिंगल लोक सुद्धा हा दिवस साजरा करू शकतात. व्हॅलेंटाइन डेला तुम्ही सिंगल असाल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमच्यासाठीही तो खास बनवण्याचे अनेक मार्ग आहेत.

स्वत: वर प्रेम करा

या दिवशी स्वतःला सर्वात जास्त महत्त्व द्या. तुम्ही अप्रतिम स्पा ट्रीटमेंट प्लॅन करू शकता. तसेच फेशियल मास्क लावा, आरामशीर आंघोळ करा, तुमचे आवडते पुस्तक वाचा किंवा शांत म्युझिक ऐका. जे तुम्हाला चांगले वाटते ते करा.

फिरायला जा

व्हॅलेंटाइन डे आणि त्यानंतरचे दोन दिवस सुट्टी घ्या आणि कुठेतरी शांत ठिकाणी फिरायला जा. असं एखादं तरी ठिकाण असेल ना जिथे तुमची जाण्याची इच्छा असेल पण अनेक दिवसांपासून तिथे जाणं शक्य होत नसेल. तिथे जाण्याची या दिवसापेक्षा चांगली संधी कोणती असेल?

Single on Valentine's Day
Valentines Day 2024 : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला दिसायचय छान? मग, ‘या’ पद्धतीने करा मेकअप, दिसाल ब्युटीफूल..!

आवडत्या गोष्टी करा

पेंटिंग, डान्स, लेखन, फोटोग्राफी तुमच्या आवडीचा कोणताही छंद निवडा आणि या दिवशी त्याची सुरुवात करा.

शॉपिंग करा

माइंड डायव्हर्ट करण्याचा शॉपिंगपेक्षा चांगला दुसरा पर्याय नसेल. तुम्ही लोकल मार्केटमध्ये फेरफटका मारू शकता. कदाचित तुम्हाला चांगल्या वस्तू खरेदी करायला मिळतील. 

गरजूंना मदत करा

अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमाला भेट देऊ शकता आणि गरजूंना मदत करू शकता. त्यांचा हसरा चेहरा पाहून तुमचे मन आनंदाने भरून जाईल.

अ‍ॅडव्हेंचर ट्रिप करा प्लॅन

14 फेब्रुवारीला तुम्ही अ‍ॅडव्हेंचर ट्रिप प्लॅन करू शकता. बंजी जंपिगपासून ते रिव्हर राफ्टिंगसारखे अ‍ॅडव्हेंचरस स्पोर्ट्स तुम्ही करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com