सावधान ! इतके तास बसून काम केलंत तर येईल हृदयविकाराचा झटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sitting for long hours

सावधान ! इतके तास बसून काम केलंत तर येईल हृदयविकाराचा झटका

मुंबई : संगणक किंवा टीव्हीसमोर तुम्ही सलग काही तास बसत असाल तर सावधान ! इतका वेळ बसून राहिल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. रोज ५-६ तास बसणाऱ्यांपेक्षा १० तास बसणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. इतकेच नाही तर हाडे, रक्तदाब, मधुमेह, इत्यादी गोष्टींवर परिणाम होतो. बसून राहिल्यामुळे blood clotचाही धोका असतो.

तुम्हाला कोणताही आजार असेल-नसेल तरीही सलग बराच वेळ बसून राहाणे वाईटच. काम करत असताना अधूनमधून विश्रांती घेऊन थोडेसे चाला. टाळेबंदीत घरातून काम करताना जीवनशैली पूर्ण बिघडली. या दरम्यान वैद्यकीय तपासण्या केलेल्या नसतील तर नक्की करून घ्या.

सतत बसून राहिल्याने रक्तदाब वाढतो व यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होतो. कंबरेच्या चारही बाजूंना चरबी वाढते. कोलेस्टेरॉल वाढते. त्यामुळे लठ्ठपणा येतो.

हाडांची हालचाल होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास मान आणि पाठीला त्रास होतो. एखादी व्यक्ती ४ तासांपेक्षा कमी वेळ बसत असल्यास त्या व्यक्तीला धोका कमी असतो. ४ ते ८ तास बसल्यास मध्यम धोका असतो. ८ ते ११ तास बसल्यास उच्च प्रतीचा धोका असतो. तसेच ११ तासांपेक्षा अधिक वेळ बसून राहिल्यास धोका अतिप्रमाणात असतो.

Web Title: Sitting For Long Hours Will Increase The Risk Of Heart Attack Diabetes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :heart attack
go to top