
मृण्मयी देशपांडे
आत्ता लिहायला मी माझ्या शेतात बसले आहे. लाइव्ह दृश्य दाखवण्याची सोय नाही, नाहीतर तुम्हाला माझ्यासमोरचा व्ह्यू दाखवता आला असता..
तुम्ही वाचाल जानेवारीमध्ये; पण लिहिताना डिसेंबर चालू आहे. सकाळचे ११ वाजले आहेत, तरी उन्हाचा पत्ता नाहीये... उन्हाचासुद्धा आणि परत हनिवाचासुद्धा (आमचे धाकटे श्वान)... आज सकाळीच माझ्या टेबलसाठी मी नवीन जागा शोधली आहे. आमच्या पोर्चच्या अगदी कॉर्नरला माझं टेबल लावून घेतलं. समोर – थोडेसे डावीकडे, एकामागे एक असे ६ डोंगर पसरले आहेत. माझ्या नाकासमोर – चिखली गावाची माची आहे. गावांमध्ये नवीन बांधलेल्या देवळाचा कळस आणि त्यावर फडकणारा झेंडा दिसतो आहे.