Anti Aging Mask- त्वचा सैल पडल्याने वय जास्त दिसतयं, मग या Homemade फेसपॅकने त्वचा दिसेल तरुण आणि चमकदार

face glow tips in Marathi: त्वचा चमकदार आणि तरुण ठेवण्यासाठी जर एखादा नैसर्गिक पर्याय निवडला तर. तुम्ही त्वचा तरुण दिसण्यासाठी मुलतानी मातीचा Multani Mitti वापर करु शकता. भारतात फार पुर्वीपासूनच त्वचा निरोगी Skin Health ठेवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जात आहे
Home Made Multani Mitti face pack
Home Made Multani Mitti face packEsakal

Multani Mitti Face Packs: त्वचा चमकदार रहावी आणि कायम तरुण दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्वचेवर कमी सुरकुत्या पडल्या ती हायड्रेट राहिली तर त्वचा अधिक तरुण दिसू लागते.

मात्र अनेकदा ताण, प्रदूषण आणि केमिकल्सयुक्त प्रोडक्ट वापरल्याने त्वचेवर वेळेआधीच सुरकुत्या पडू लागतात. Skin Care Hacks Marathi Multani Mitti Face Packs for Anti Aging

त्वचा Skin सैल पडू लागते आणि चेहरा Face वयस्क दिसू लागतो. अलिकडे बाजारात अनेक अँटीएजिंग क्रिम आणि सिरम यउपलब्ध आहेत. मात्र हे प्राॅडक्ट महाग आहेत. शिवाय यामुळे साईड इफ्टेक्ट होण्याची शक्यता देखील जास्त असते. 

त्वचा चमकदार आणि तरुण ठेवण्यासाठी जर एखादा नैसर्गिक पर्याय निवडला तर. तुम्ही त्वचा तरुण दिसण्यासाठी मुलतानी मातीचा Multani Mitti वापर करु शकता.

भारतात फार पुर्वीपासूनच त्वचा निरोगी Skin Health ठेवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जात आहे. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. मुलतानी मातीमुळे डेड स्किन निघण्यास मदत होते त्यामुळे चेहरा उजळतो. 

मुलतानी मातीपासून तयार करण्यात आलेल्या काही फेसपॅकमुळे Face Pack तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होवून त्वचा चमकदार आणि निरोगी बनेल. पाहुयात मुलतानी मातीपासून तयार करण्यात आलेले काही फेसपॅक

मुलतानी माती आणि दूध- हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका वाडग्याच २-३ चमचे मुलतानी माती घ्या. त्यानंतर त्यात कच्च दूध टाका. दोन्ही सामुग्रीच जाड पेस्ट तयार करा. अशा प्रकारे तुमचा फेस टायटनिंग फेसपॅक तयार होईल. 

हे देखिल वाचा-

Home Made Multani Mitti face pack
Summer Skin Care: चेहऱ्याला लावा हा फ्रूट ज्यूस आणि पहा कमाल; २ आठवड्यात Wrinkles होतील गायब, चेहरा दिसेल तरुण

हा फेसपॅक लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करा. त्यानंतर संपूर्ण चेहरा आणि गळ्याला फेसपॅक लावा. त्यानंतर मास्क केवळ ८-१० मिनिटं वाळू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धूवा . आठवड्यातून २ वेळा तरी या फेलपॅकचा वापर करा. यामुळे चेहऱ्याची सैल पडलेली त्वचेला टायटनिंग कमी होते. 

दही मुलतानी माती फेसपॅक- उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी मुलतानी मातीचा वापर फायदेशीर ठरतो. तसचं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

यासाठी दोन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा दही आणि अर्धा चमचा गुलबाजल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून चेहरा आणि मानेला लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.  

यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील. त्वचा ताणली जाईल. तसचं त्वचेला चमक येईल. Multani mitti foe skin tighten 

Home Made Multani Mitti face pack
Papaya Face Pack: मऊ आणि नितळ त्वचा हवीये? तर पपईचा असा करा वापर

मुलतानी मातीचे फायदे (Multani Mitti face pack benefits)

  • मुलतानी माती ही खास करून मुरुम आणि त्वचेवरील पुटकुळ्यांची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे.

  • मुलतानी माती त्वचेवरील सीबम आणि तेल काढून टाकण्यास मदत करते. घाण, घाम आणि अशुद्धता काढून टाकून त्वचेला खोलवर शुद्ध करते. तसचं त्वचेचा टोन सुधारून त्वचा चमकदार बनवते.multani mitti in summer

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com