Home Remedies For Skin Care: Sakal
लाइफस्टाइल
Skin Care Tips: 'या' पानांपासून बनवलेली क्रिम चेहऱ्यावर आणेल चमक, अशा प्रकारे घरीच बनवा
Home Remedies For Skin Care: तुम्हाला चेहऱ्यावर चमक हवी असेल तर कडूलिंबाच्या पानांचा वापर करू शकता.
Home Remedies For Skin Care: अनेक लोक पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी विविध ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. कारण पावसाळ्यात त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लोक त्वचेची काळजी घेऊन त्वचा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार बाजारात महागड्या क्रीम्स मिळतील, पण या रेडिमेड क्रीम्सचा प्रभाव काही दिवसच राहतो.
तुम्हाला घरगुती क्रिम बनवायचे असेल कडुनिंबाचा वापर करू शकता. यामुळे त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो आणि अनेक समस्या दूर राहतात. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टीरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे त्वचेसंबंधित असलेल्या समस्या कमी होतात. कडूलिंबाच्या पानांपासून क्रिम कसे बनवायचे हे पुढील पद्धतीने जाणून घेऊया.

%20(720%20x%201280%20px)%20(720%20x%201280%20px)%20(720%20x%201280%20px)%20(1200%20x%20675%20px)%20(2).jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)