Dry and Dull Skin
Dry and Dull Skin sakal

Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज झाली आहे? 'या' टिप्स वापरुन घ्या काळजी

Take Care Of Your Dry And Dull Skin in Winter: हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे त्वचेतील तेलकटपणा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. काही वेळा भेगाही पडतात किंवा खरखरीत होते.
Published on

Take Care Of Your Dry And Dull Skin: हिवाळा आपल्या प्रकृतीसाठी लाभदायक ठरतो, तसा तो त्वचेच्या समस्याही निर्माण करू शकतो. म्हणून हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना नेमकी समस्या काय आहे. हे पाहूनच उपाययोजना कराव्यात असा सल्ला त्वचारोग तज्ञ देत असतात.

हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे त्वचेतील तेलकटपणा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. काही वेळा भेगाही पडतात किंवा खरखरीत होते. त्वचा निस्तेज दिसू लागते. खरेतर त्वचेचे मॉइश्चरायझर म्हणजेच ओलावा कमी झाल्यामुळे असे होते. या हिवाळ्यातील नियमित समस्या आहेत. परंतु, हा काही त्वचेचा विकार नाही. म्हणून हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा दिवसातून एक ते दोन वेळा वापर करावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com