esakal | त्वचा व सौंदर्य चिरतरुण ठेवायचे असेल 'हे' कराच!
sakal

बोलून बातमी शोधा

beauty tips

त्वचा व सौंदर्य चिरतरुण ठेवायचे असेल 'हे' कराच!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

३० ओलांडल्यानंतरही आपण सुंदर (beauty) दिसावे आणि मुख्य म्हणजे तरुण दिसावे, असे प्रत्येक स्त्रीला वाटते. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर (face and skin beauty) फाईन लाईन्स, सुरकुत्या दिसू लागतात. तर त्वचेचा रंगही बदलत जातो. पण यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तारुण्य टिकवण्यासाठी या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील...

क्लिंझर

काही जण तेलकट त्वचेमुळे त्रस्त असतात. ही समस्या दूर करण्यासाठी केमिकलयुक्त साबण, फेस वॉश तसंच क्लींझरचा वापर केला जातो. पण यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल आणि मॉइश्चराइझरवर दुष्परिणाम होतात. त्वचा रुक्ष आणि कोरडी होऊ लागते. असे झाल्यास त्वचेशी संबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्वचा कोरडी झाल्यास चेहऱ्यावरील ग्लो कमी होतो. ज्यामुळे तुम्ही म्हातारे दिसू लागता.

हेही वाचा: उन्हाळ्यात ट्राय करा डी-टॅन फेसपॅक! चेहरा होईल उजळ

अंमली पदार्थांचे सेवन टाळा

दैनंदिन जीवनातील चुकीच्या सवयींमुळेही आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होत असतात. उदाहरणार्थ मद्य सेवन, सिगारेट ओढणे इत्यादी वाईट सवयींमुळे आपल्या त्वचेचं भरपूर नुकसान होते. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर संपूर्ण शरीरावरही नकारात्मक परिणाम होतात. यामुळे गंभीर आजारांचीही लागण होते.

पुरेशी झोप

सुंदर आणि नितळ चेहऱ्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे. नियमित किमान सात ते आठ तासांची झोप घ्यावी. पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. शारीरिक तसंच मानसिक आरोग्यही चांगलं राहते. महत्त्वाचे म्हणजे तुमची त्वचा तरुण राहण्यास मदत मिळेल. यामुळेच पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे.

भरपूर पाणी

त्वचा हायड्रेट राहण्यासाठी दिवसभरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्या. शरीर डिटॉक्स करण्याची ही नैसर्गिक आणि सोपी प्रक्रिया आहे. पाण्यामुळे चेहऱ्यावर चमक वाढते. पाण्यामुळे त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार राहण्यात मदत मिळते. आंघोळ केल्यानंतर त्वचेवर हायड्रेटिंग लोशन देखील लावा.

loading image
go to top