Driving Tips कारसाठी खरेदी करा स्वस्तात मस्त गॅजेट्स, Luxury Look आणि प्रवासही आरामदायी

Car बाजार किंवा ऑनलाईन अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही असे काही गॅजेट्स Gadgets खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमच्या कारला ही लक्झरी लूक येईल.
Gadgets to Decorate your Car
Gadgets to Decorate your CarEsakal

Car ड्राईव्ह करत असताना किंवा कारने प्रवास करत असताना तो आरामदायी होण्यासोबत प्रवास सुरक्षित होणं देखील अत्यंत गरजेचं असतं. सध्याच्या काळामध्ये तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत.

कारसाठी देखील अलिकडे विविध गॅजेट्स Gadgets बाजारामध्ये उपलब्ध आहेत. Smart Tips How to decorate your car for luxury look and Comfort

या गॅजेट्सच्या मदतीने तुमचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि सोपा होवू शकतो. अलिकडे अनेक लक्झरी किंवा प्रिमियम कारमध्ये Premium Cars तसंच महागड्या कार्समध्ये कंपनीकडून विविध सेफ्टी फिचर्स किंवा गॅझेट्स दिले जातात. मात्र जर तुमच्या कारमध्ये तुम्हाला हवे असलेले काही गॅझेट्स किंवा फिचर्स नसतील तरी चिंता करू नका.

कारण कार बाजार किंवा ऑनलाईन अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही असे काही गॅजेट्स Gadgets खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमच्या कारला ही लक्झरी लूक येईल. शिवाय तुम्ही तुमच्या मनाजोगी कार तयार करू शकता.

असे कोणते गॅझेट्स आहेत जे कारमध्ये असल्याने तुम्हाला प्रवासात मदत होईल याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

सेंटर आर्मरेस्ट- अनेक कारमध्ये खास करून हॅचबॅक किंवा बेसिक कार मॉडलमध्ये कंपनीकडून आर्मरेस्ट दिलं जातं नाही. खास करून ड्रायव्हरला कार चालवताना प्रवास आरामदायी व्हावा यासाठी आर्मरेस्ट महत्वाचं असतं.

जर तुमच्या कारमध्ये आर्मरेस्ट देण्यात आलेलं नसलं तरी तुम्ही ते ऑनलाईन किंवा कार एक्सेरिजच्या दुकानातून खरेदी करून बसवू शकता. अगदी १-२ हजार रुपयांमध्ये हे आर्मरेस्ट तुम्हाला उपलब्ध होईल.

हे देखिल वाचा-

Gadgets to Decorate your Car
Travel Gadgets : फिरायला जाताय? सोबत ठेवा हे महत्त्वाचे गॅजेट्स! प्रवास होईल आरामदायक

मोबाईल होल्डर- कार ड्राइव्ह करत असताना मोबाईलचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं. मात्र अलिकडे प्रवास करत असताना मॅपस्चा वापर करणं किंवा काही महत्वाच्या काॅल्ससाठी फोनवर बोलणं गरजेचं असतं. अशावेळी मोबाईल होल्डरचा वापर उपयुक्त ठरतो.

कारच्या डॅशबोर्ड किंवा काचेवर लावण्यासाठी अगदी २०० रुपयांपासून मोबाईल होल्डर विकत मिळतात. हे मोबाईल होल्डर तुम्ही कारमध्ये बसवू शकता. यामुळे तुम्हाला मॅप पाहणं किंवा काही महत्वाचे SMS तसंच नोटिफिकेशन पाहणं सोपं होवू शकतं.

टायर इनफ्लेटर- कार प्रवासासाठी महत्वाचं असलेलं आणखी एक महत्वाचं गॅजेट म्हणजे टायर इन्फ्लेटर. याच्या मदतीने तुम्ही कमी वेळेत अगदी सहज टायरचं प्रेशर चेक करू शकता. तसंच प्रवासादरम्यान जर तुमचं टायर पंक्चर झालं किंवा टायरमधील हवा कमी झाली तर तुम्ही हवा देखील भरू शकता. साधारण हजार दोन हजार रुपयांमध्ये तुम्हाला टायर इन्फ्लेटर खरेदी करता येईल.

ब्लाइंड स्पॉट मिरर- अनेकदा कार पार्क करत असताना, रिव्हर्स घेत असताना किंवा ड्रायइव्ह करत असतानाही काही गोष्टी कारच्या साइड मिररमध्ये स्पष्ट दिसत नाहीत. अशा वेळी हे ब्लाइंड स्पॉट मिरर महत्वाचे ठरतात. हे मिरर तुम्ही 360 डिग्रीमध्ये रोटेट करू शकता.

अॅम्बियन्स लाइट- कारला एक क्लासिक लूक देण्यासाठी तुम्ही कारमध्ये ऍम्बियन्स लाइट बसवू शकता. अगदी सोप्या पद्धतीने हे लाइट बसवता येतात. या लाइट्समध्ये विविध मोड असतात. तुम्ही वेगवेगळे रंग किंवा बदलत्या रंगांचा पार्टी मोड लाइट सेट करू शकता. हे लाइट हजार रुपयांच्या आतच ऑनलाइन उपलब्ध आहेत.

या शिवाय सीटबेल्ट कुशन, व्हॅक्यूम क्लिनर, कार बूट ऑर्गनायझर, फोन चार्जर असे काही गॅजेट्स तुम्हाला कार प्रवासात तुम्हाला कामी येऊ शकतात.

हे देखिल वाचा-

Gadgets to Decorate your Car
Safe Cars- या गाड्यांमध्ये मिळेल तुम्हाला चांगली सुरक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com