Mobile च्या कानाकोपऱ्यातील घाण सहज निघेल बाहेर, Phone Cleaning साठी खास टिप्स

Mobile Cleaning Tips: मोबाईलचा केवळ स्क्रिन वरचेवर पुसत राहणं किंवा स्वच्छ करणं म्हणजे मोबाईल स्वच्छ ठेवणं नव्हे तर वेळोवेळी मोबाईल डिप क्लिन करणं गरजेचं असतं. यासाठीच्या या काही टिप्स
Mobile Cleaning Tips
Mobile Cleaning Tips Esakal

Mobile Cleaning Tips : आपण स्वच्छ राहण्यासाठी दररोज आंघोळ करतो. आंघोळीनंतर स्वच्छ धुतलेले कपडे घालतो. घराची देखील वरचेवर साफ सफाई करतो. एकंदर आपण जिथे राहतो किंवा ज्या वस्तू वरेवर वापरतो त्या स्वच्छ ठेवण्याचा Cleaning प्रयत्न करतो. Smart Tips in Marathi How to clean your mobile without going to service center

मात्र एक अशी वस्तू किंबहूना इलेक्ट्रॉनिक उपकरण Electronic Gadget जे आपल्या प्रत्येकासाठी महत्वाचं आहे त्याच्या स्वच्छतेकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. ती वस्तू म्हणजे मोबाईल Mobile. सध्या प्रत्येकजण मोबाईलचा वापर करतो. मात्र यातील अनेकजण मोबाईल स्वच्छ ठेवण्याकडे Cleaning साफ दुर्लक्ष करतात.

मोबाईलचा केवळ स्क्रिन वरचेवर पुसत राहणं किंवा स्वच्छ करणं म्हणजे मोबाईल स्वच्छ ठेवणं नव्हे तर वेळोवेळी मोबाईल डिप क्लिन करणं गरजेचं असतं.

आपल्यापैकी अनेकजण किमान २ ते ३ वर्ष तरी किंवा त्याहून जास्त काळ एकच मोबाईल किंवा स्मार्टफोन Smartphone वापरतात. अशा वेळी मोबाईल वेळोवेळी डिप क्लिन करणं गरजेचं आहे. असं न केल्यास मोबाईलचं लाइफ कमी होवू शकते. तसंच मोबाईलमध्ये वेळेआधीच काही बिघाड निर्माण होतात. योग्य चार्जिंग न होणं, व्हाॅल्यूम कमी होणं अशा समस्या दिसू लागतात.

मोबाईल डिप क्लिन करण्यासाठी तुम्हाला सर्व्हिस सेंटर किंवा मोबाईल शॉपमध्ये जाण्याची गरज नाही. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही मोबाईल स्वच्छ ठेवू शकता.

हे देखिल वाचा-

Mobile Cleaning Tips
दुसरं कुणी तुमचा Mobile Number वापरतंय का? जाणून घ्या Sim Scam आणि वेळीच व्हा सावध

इयरबड्सचा वापर

मोबाईल स्वच्छ करत असताना नाजूकपणे हाताळणं गरजेचं असतं. यासाठी तुम्ही इयरबड्सचा वापर करू शकता. मोबाईल कानाकोपऱ्यामध्ये स्वच्छ करण्यासाठी याचा वापर होवू शकतो.

इयरबड्सच्या मदतीने तुम्ही चार्जिंग पोर्ट, कॅमेरा, स्पीकर ग्रील अगदी सहजपणे आणि नाजूकपणे स्वच्छ करू शकता. तसचं हेडफोन पोर्ट स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही इयरबड्सचा वापर करू शकता.

मायक्रोफायबर

मोबाईल स्वच्छ करण्यासाठी किंवा पुसण्यासाठी जर तुम्ही कोणतही कापड वापरत असाल तर ते नुकसानदायक ठरू शकतं. यामुळे मोबाईलच्या स्क्रिनवर किंवा बॉडीवर स्क्रॅच पडू शकतात. यासाठी मोबाईल स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबरचा वापर करा.

मायक्रोबायर हे अत्यंत सॉफ्ट असतं. यामुळे मोबाईलच्या स्क्रिनवर ओरखडे किंवा चरे पडत नाहीत. या कापडाच्या मदतीने मोबाईल स्वच्छ करणं सोप होतं. खास करून स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या लेन्स या अत्यंक नाजूक असल्याने त्यावर चरे पडू नयेत यासाठी मायक्रोफायबरने कॅमेऱ्याच्या लेन्स स्वच्छ करा.

कोणत्याही सुपरमार्केटमध्ये किंवा ऑनलाईन देखील मायक्रोफायबर हे साधारण १०० रुपयांमध्ये सहज उपलब्ध होतं.

अशा प्रकारे या सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाईल डिप क्लिन करू शकता.

हे देखिल वाचा-

Mobile Cleaning Tips
Mobile Tips : तुटलेल्या स्क्रीनचा स्मार्टफोन वापरणं ठरू शकतं घातक! आजच बदलून घ्या मोबाईलचा डिस्प्ले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com