Snakebite Emergency Steps: सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात पोचेपर्यंत काही प्राथमिक उपचार करणे आवश्यक आहेत. सर्प विष प्रतिबंधक लस उपलब्ध असलेल्या जवळच्या रुग्णालयात त्या व्यक्तीला त्वरित घेऊन जावे..परंतु कोणत्याही प्रकारची हालचाल अथवा परिश्रम त्या व्यक्तीला करू देऊ नयेत. सर्पदंश झालेल्या व्यक्तीने वांती केल्यास त्याला उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपावे, असे केल्याने त्याला श्वासोच्छ्वासास अडथळा येणार नाही..Solapur Leopards: सोलापूर जिल्ह्यात बिबट्यांची शंभर पार? वाढत्या वावरामुळे चिंता, जनजागृती हाच उपाय!.सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या भोवती गर्दी करू नये. शांतता राखावी, त्याला घाबरून न देता धीर द्यावा. साप दंश करतो तो पायाला किंवा हाताला बाकी अवयवांच्या ठिकाणी फार कमी दंश होतात. साप जेव्हा दंश करण्याच्या तयारीत असतो तेव्हा तो एका सरळ रेषेत झेप घेऊन बरोबर भक्ष्यावर नेम साधतो. झेप घेत असताना साप तोंड उघडतो त्या वेळी त्याच्या विषारी सुळ्या दातांची ठेवण सरळ उभी बनते हे उभे विषाचे दात भक्ष्याच्या अंगात रोवल्यानंतर त्या विषारी दातांच्या वर लागून असलेल्या विष ग्रंथीतून विष भक्ष्याच्या अंगात जाते. ज्याप्रमाणे औषधाच्या ड्रॉपरवर दाब दिला असता औषधाचा थेंब बाहेर येतो त्याप्रमाणे हे विष भक्ष्याच्या शरीरात पोहोचते..सामान्यपणे सर्पदंशामुळे मृत्यू उडवतोच असे नाही. विषारी सापाने दंश केला असता त्याने विषाची मात्रा किती प्रमाणात शरीरात सोडली त्यावर तो दंश धोकादायक आहे किंवा नाही हे अवलंबून असते. तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, मानसिकता कशी आहे यावर परिणाम दिसून येतो ..सापाच्या विषाचे प्रकार१) न्यूरोटॉक्सिक (मज्जाबाधक सर्पदंश)हे विष मज्जासंस्था किंवा चेतासंस्थेवर अनिष्ट परिणाम करते. नाग, मण्यार यांचे विष या प्रकारात मोडते. यामध्ये दंश झालेल्या जागी वेदना होतात तर कधी कधी वेदनाही होत नाहीत, चावलेल्या जागी सूज येते, डोळ्यापुढे अंधारी येते, पापण्या जड होतात, पाय थरथरतात, बोलणे अडखळते, श्वास घेण्यास त्रास होतो, दम लागणे अशी लक्षणे दिसून येतात.२) हेमोटॉक्सिक (रक्तबाधक सर्पदंश)हे विष रक्त व रक्तवाहिन्यांवर परिणाम करते, ज्यामुळे रक्त गोठण्यास किंवा रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते. घोणस व फुरसे यांचे विष या प्रकारात मोडते. नाडी जलद चालणे, शरीर थंड पडू लागणे, डोळ्यांच्या भावल्या प्रसरण पावणे, मळमळल्यासारखे होणे, अशक्तपणा वाटणे, तसेच यामध्ये दंश झालेल्या भागातून रक्त मिश्रित द्रव पाझरू लागतो. नाक, हिरड्या, लघवी, गुदद्वार इत्यादीतून रक्तस्त्राव सुरू होतो. साधारणपणे चोवीस तासानंतर मूत्रपिंडाचे कार्य बंद झाल्याने रोग्याला अतिमूत्रता आजार होऊन विष रक्तात पसरू लागते. या दोन्ही प्रकारामध्ये वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेतल्यास व्यक्तीचा मृत्यू टाळता येतो..SSC & HSC Supplementary Result: दहावी-बारावी पुरवणी निकाल जाहीर; अशा पद्धतीने पाहा तुमचा रिझल्ट स्टेप-बाय-स्टेप!.दंशाच्या खुणांवरून ओळखासाप विषारी की बिनविषारीसर्पदंश झाला असता तो दंश विषारी सापापासून की बिनविषारी सापापासून झालेला आहे हे सर्पदंशाच्या खुणांवरून सहज समजून येते. जर विषारी साप चावला असेल तर दंशाच्या ठिकाणी दोन ठळक खुणा(सुळ्या विषारी दातामुळे) व त्याचे खाली इंग्रजीतील ‘यु’ आकारात खुणा स्पष्टपणे आढळून येतात. परंतु बिनविषारी साप चावला असेल तर दोन ठळक खुणा दंशाच्या जागेवर आढळून येत नाहीत म्हणजेच फक्त ‘यु’ या आकाराच्या खुणा आढळतात.सर्पदंश झालेली व्यक्ती दगावली आहे असे वाटल्यास डॉक्टरांना विनंती करून दंश झालेल्या व्यक्तीच्या जांघेत टेथेस्कोप लावण्यास विनंती करावी. अनेकदा नाडी हृदय चालत नाही मात्र, जांघेतील नाडी चालू राहते. यावेळी अनस्थेशिया (भूलतज्ज्ञ) डॉक्टरांची मदत योग्य ठरते.- प्रा. धनंजय देशमुख, सर्प अभ्यासक, अकलूज.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.