सोशल मीडियाचा हवा स्मार्ट वापर

आजच्या डिजिटल युगामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते. जवळजवळ ४५ टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहेत.
Social Media
Social Mediasakal
Updated on

- अश्‍विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार

आजच्या डिजिटल युगामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते. जवळजवळ ४५ टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहेत. प्रत्येक तीन लोकांमधली एक व्यक्ती सोशल मीडियावर आहे आणि या मीडियाचा वापर फक्त संवादाचे साधन म्हणून न राहता आपल्या व्यक्तिमत्त्वाची एक ओळख बनली आहे.

मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का? आपण ऑनलाइन कसे व्यक्त होतो, कशा प्रकारच्या पोस्ट करतो, कोणत्या चर्चा किंवा विषयांमध्ये भाग घेतो, यावरून लोक आपल्याबद्दल ठरावीक मत तयार करतात. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना जबाबदारीने वागणे आणि आपले ऑनलाइन व्यक्तिमत्त्व नीट घडवणे गरजेचे आहे.

भान का आवश्यक?

१) सोशल मीडियावरील पोस्ट, कमेंट्स आणि शेअर्समुळे तुमची मते लोकांना कळतात आणि त्यातून तुमची इमेज तयार होते.

२) अनावश्यक आक्षेपार्ह आणि असत्य पोस्टमुळे तुमची विश्वासार्हता कमी होते.

३) जाणते अजाणतेपणात तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करता ज्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो

४) ऑनलाइन किंवा सोशल मीडियावरचा संवाद प्रत्यक्ष संवादाइतकाच महत्त्वाचा आहे, त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात, नाती दुरावू शकतात.

अनेकदा आपल्याला सोशल मीडियाची पोहोच आणि महत्त्व लक्षात येत नाही; पण सोशल मीडियावरील तुमचे व्यक्तिमत्त्व चांगले घडवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत- ज्यांनी नातेसंबंध, गोपनीयता, विश्वासार्हता टिकून राहण्यास मदत होईल.

हे भान ठेवा

१) सोशल मीडियावरती संवाद साधताना किंवा पोस्ट करताना, शेअर करताना आदरपूर्वक, सकारात्मक आणि सुसंस्कृत भाषेचा वापर असावा असावा.

२) शेअर करत असलेली माहिती सत्य आणि योग्य आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

३) संवेदनशील विषय, अनावश्यक वाद अपमानास्पद बोलणे यापासून दूर राहा. मते मांडताना दुसऱ्या मतांचा आदर करा.

४) तुमचे वैयक्तिक फोटो, लोकेशन, खासगी माहिती उघडपणे शेअर करू नका. कोणत्या गोष्टी सार्वजनिक ठेवायच्या आणि कोणत्या खासगी, हे नीट ठरवा.

५) फेक न्यूज, अफवा, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट शेअर करू नका. माहिती शेअर करण्याआधी तिचा स्रोत आणि विश्वासार्हता तपासा.

६) सोशल मीडियाचा प्रभावपूर्वक वापर करण्यासाठी तुमच्या क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती शेअर करा आणि तुमची व्यावसायिक प्रतिमा निर्माण करा.

७) सोशल मीडियाचा वापर तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याला हानिकारक होणार नाही याची काळजी घ्या. अधूनमधून डिजिटल डिटॉक्स होऊ शकता.

मैत्रिणींनो, सोशल मीडिया हे प्रभावशाली साधन आहे. मात्र, त्याचा जबाबदारीने वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या ऑनलाइन व्यक्तिमत्त्वावर तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा परिणाम होतो. त्यामुळे सजग, सकारात्मक, जबाबदार राहून सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com