बिस्किटवाल्याचं प्रेमपत्र; प्रिय Marie, तुझाच Tiger | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral photo

यातील मायना वाचून तुम्हाला हसू तर येईलच शिवाय हे पत्र तुमचंही हृदय जिंकून घेईल.

बिस्किटवाल्याचं प्रेमपत्र; प्रिय Marie, तुझाच Tiger

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सोशल मीडियावर बऱ्याच आगळ्या वेगळ्या पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर बऱ्याच वेळा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही टीकाही होत असतात. आता या सगळ्यात एक मजेशीर प्रेमपत्रही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हे प्रेमपत्र आहे एका बिस्कीट प्रेमी व्यक्तीचे. यातील मायना वाचून तुम्हाला हसू तर येईलच शिवाय हे पत्र तुमचंही हृदय जिंकून घेईल.

हेही वाचा: 'आईने तिच्या मुलीला 'या' चार गोष्टी सांगितल्याच पाहिजेत!'

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे प्रेमपत्र एका आयपीएस अधिकाऱ्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. यासोबत त्यांनी याला कॅप्शन लिहले आहे. Biscuit wale ka PREM-PATRA. एक प्रेम पत्र... देखिए PREM सबको कैसे बांध लेता है.... #Competitors को भी...अशा कॅप्शसहित ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

या बिस्कीट प्रेमी व्यक्तीने या प्रेमपत्राला एका वेगळ्या अंदाजात लिहले आहे. यात त्याने अनेक बिस्कीटांची आणि त्या संबंधित कंपन्यांची नावे लिहली आहेत. पाहुयात नेमके काय लिहले आहे या पत्रात.....'Dear Marie. Today is a Goodday. U have Krack Jacked my Little Heart. Now I am in 50-50 state of mind. Don't break my Fantasy. Meet me at Parle Junction.Plz dontplay Hide n Seek. Have a nice day tumhara Tiger.' हे अनोखे पत्र लोकांच्या पसंतीला उतरत असून अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. अनेक लोकांचे या पत्राने हृदय जिंकले आहे. सोशल मीडियावर हे पत्र तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: प्यार कर... प्रेम करण्याचे हे 5 प्रकार माहिती आहेत का?

loading image
go to top