सकारात्मक व्यक्तिमत्त्व व आंतरिक उर्जेचा आविष्कार म्हणजे स्त्रीचे सौंदर्य असते. त्यामुळे प्रत्येक महिलेने सुंदर नसल्याचा न्यूनगंड काढण्यासाठी मिशन ब्यूटीचा संदेश एक लाख महिलांपर्यंत पोहोचवणार असल्याचे मत त्वचारोग तज्ज्ञांनी व्यक्त केले..सकाळ कार्यालयात सकाळ संवाद कार्यक्रमासाठी त्वचारोग तज्ञ डॉ. स्मिता चाकोते, डॉ. राजश्री वाघचवरे, डॉ. श्रुती मठ, डॉ. कांचन उकरंडे व डॉ.मानसा बोल्ली यांची उपस्थिती होती.मिशन ब्यूटीची पंचसूत्रीमहिलांमध्ये अनेक वेळा मी सुंदर नाही असा न्यूनगंड येतो. मी सुंदर कशी दिसेल असाही प्रश्न तिच्या समोर असतो. सौंदर्य हा पूर्णपणे आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण आविष्कार आहे. त्यामुळे पाच मुद्द्यांवर सौंदर्य खुलवता येते. त्यामध्ये स्कीन केअर या पहिला मुद्द्यात फेस वॉश, मॉईश्चरायझर व सन ग्लासचा वापर या गोष्टी येतात..Yoga And Meditation: जिमला जायचा कंटाळा? घरबसल्या सोशल मीडियावरून योग आणि प्राणायामचे 'घ्या'धडे!.हेल्थ केअरमध्ये चांगला व्यायाम, परिपूर्ण चौरस भोजन, गुणवत्तापूर्ण आठ तासाची झोप, भरपूर पाणी पिणे या गोष्टी आहेत. तसेच लठ्ठपणा, ॲनिमिया अशा आजारापासून स्वतःची सुटका करावी. माईंड केअरमध्ये नियमित वाचन, संस्कार, सकारात्मक विचार, चांगले चरित्र व सुसंगती या गोष्टी आहेत. हार्टकेअरमध्ये स्वतःवर प्रेम करण्यासोबत मातृत्व हा वैश्विक प्रेमाचा वारसा चालवणे होय. द्वेष, मत्सर, क्रोध रहित खरे प्रेम सर्वाविषयी असावे. सोल केअरमध्ये ध्यान, प्रार्थना, भक्ती व नामस्मरणाचा समावेश असावा. या पद्धतीने सौंदर्याचा आविष्कार होतो..त्वचेची काळजीसर्वसाधारणपणे तेलकट, कोरडी व मिश्र या तीन पद्धतीची चेहऱ्याची त्वचा असू शकते. पिंपल्स नसतील तर मॉईश्चरायझरचा वापर करण्यास हरकत नाही.कोरड्या त्वचेला सिरॅमाईड बेसचे मॉईश्चरायझर वापरावे. उन्हापासून त्वचेचे रक्षण केले पाहिजे. त्यासाठी स्कार्फ, छत्री व सन ग्लासेसचा वापर करावा. सनस्क्रीन विकत घेताना त्यामध्ये सन प्रोटेक्शन फॅक्टर (एसपीएफ)३० ते ५० मध्ये असावा. पीएसए (प्रोटेक्शन फॅक्टर फ्रॉम यूव्हीए लाईट) थ्री स्टार असावे. साधे कॅलमिन लोशन नियमित वापरले तरी ते पुरेसे ठरते. .आधुनिक यंत्र सामग्रीचा वापरत्वचा रोगावर उपचार करताना आधी रुग्णांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याचे सौंदर्य व प्रकृतीबद्दल समुपदेशनाची गरज असते. तणावाचा देखील सौंदर्यावर विपरीत परिणाम होतो. एआय बेस्ड स्कीन ॲनालायझर सारखी यंत्रे त्वचेच्या आरोग्यासाठी प्रभावी उपयोग होतो. पिगमेंट, रिंकल, त्वचा रंध्रे, फोटो एजींग या सारख्या गोष्टी त्यातून समजतात. लेझर तंत्राचा वापर देखील होऊ लागला आहे.सौंदर्याच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी नकोत्वचेवर उपचार करण्याआधी संबंधित व्यक्तीचे त्याबाबतचे अधिकृत शिक्षण किंवा पदवी तपासावी. पार्लरच्या नावाखाली अनेक वेळा त्वचेचे ज्ञान नसलेल्या लोकांकडून चुकीच्या गोष्टी केल्याने त्वचेचे नुकसान होते. नुकसान झाल्यानंतर नंतर तेच लोक उपचारासाठी त्वचारोग तज्ञांकडे येतात. अनेक लोक कॉस्मॅटोलॉजीस्ट म्हणून उपचार करतात तेही चुकीचे आहे. प्रत्यक्षात त्वचारोग तज्ज्ञ हे एमबीबीएस पदवीनंतर डीव्हीडी किंवा एमडी ही पदव्युत्तर पदवीधारकांकडे उपचार घ्यायला हवेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.