Sidhrameshwar Yatra 2025: ९०० वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात; ६८ लिंगाला तेलाभिषेक, नंदीध्वज मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी
Sidhrameshwar Yatra Solapur: सोलापुरात मकर संक्रांतीच्या वेळी पाच दिवस श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची मोठी जत्रा दरवर्षी भरते. ९०० वर्षाची परंपरा असलेल्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा आज १२ जानेवारीपासून शहरातील ६८ लिंगाना तेलाभिषेकापासून सुरुवात झाली आहे
सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजच्या यात्रेला आज पासून सुरुवात झाली आहे. विविध भाविक या यात्रेत सहभागी होत असतात. ५ दिवस चालणाऱ्या या यात्रेचा आज पहिला दिवशी यन्नीमंजन म्हणजेच तैलअभिषेक सोहळा आज पार पडत आहे