गोष्ट सोलो प्रवासाची : आव्हानावर मात

Solo Travel During Covid: An Inspiring Journey from India to Costa Rica and New York : कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुलगा आणि गर्भवती सुनेला साथ देण्यासाठी एका महिलेने एकट्याने अमेरिकेचा प्रवास केला. भारतातून थेट प्रवेश बंद असताना कोस्टारिकात चौदा दिवस क्वारंटाईन राहून तिने आव्हानात्मक प्रवास यशस्वी केला.
Solo Travel During Covid: An Inspiring Journey from India to Costa Rica and New York

Solo Travel During Covid: An Inspiring Journey from India to Costa Rica and New York

ESAKAL
Updated on: 

डॉ. मेधा कुलकर्णी

शिक्षणानिमित्त, कौटुंबिक कारणांनी, नोकरीनिमित्त अनेक वेळा एकटीनं बसनं, ट्रेननं, विमानानं प्रवास केला; पण स्मरणात राहिली ती सोलो ट्रिप होती २०२१ च्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमधील. त्या काळात आंतरराज्य आणि परदेश प्रवासावर खूपच निर्बंध होते. माझा मोठा मुलगा आणि सून अमेरिकेला होते. सून पहिल्यांदाच गर्भवती होती. त्यात त्या दोघांनाही कोविड झाला. भीतीचं वातावरण, लॉकडाऊन, एकटेपणा यामुळे त्यांचं आणि आमचंही मनोधैर्य खचलं होतं. या परिस्थितीत त्यांना सोबत आणि थोडा मानसिक रिलीफ म्हणून मी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...