Somvati Amavasya 2024: पितृदोषाच्या त्रासातून मुक्तीसाठी सोमवती अमावस्येला करा हे उपाय, अडचणींच्या फेऱ्यातून होईल सुटका

भगवान शंकर माता पार्वतीची पूजा केल्यानेही फरक पडतो
Somvati Amavasya 2024
Somvati Amavasya 2024esakal

Somvati Amavasya 2024: 

सर्व अमावस्यांमध्ये श्रेष्ठ असलेली सोमवती अमावस्या लवकरच येणार आहे. जी अमावस्या सोमवारी येते त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोमवती अमावस्येला भगवान शंकरांची उपासना केल्याने इच्छित फळ मिळते असे सांगितले जाते.

याबरोबरच ज्या घरावर पितर नाराज असतात. ज्या लोकांच्या प्रगतीत अडथळे आणतात अशांसाठी सोमवती अमावस्या खास ठरते. कारण पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय अमावस्येदिवशी केल्याने समाधानकारक बदल घरात घडू शकतात. 

Somvati Amavasya 2024
Somvati Amavsya : घरात पितृदोष असेल तर सोमवती अमावस्येला हे उपाय करा, लाभेल सुख, शांती

काहीवेळा असंही जाणवतं की घरी आर्थिक अडचणी असतात, तर काही घरात पैशांची कमी नसते पण मानसिक शांतता मिळत नाही. कौंटुंबिक कलह, वाद यामुळे मानसिक सुख मिळणे कठीण होते. त्यावेळी काही जवळचे लोक कुंडली, वास्तूदोष आहे का याची चौकशी करण्याचा सल्ला देतात.

तुम्हालाही घरात अशा गोष्टींचा सामना करावा लागत असेल. तर सोमवती अमावस्येदिवशी काही उपाय केल्याने या दोषांतून मुक्ती मिळू शकते. असे कोणते उपाय आहे ते पाहुयात.

Somvati Amavasya 2024
Somvati Amavasya 2023 : आज चुकूनही करु नका 'ही' कामे अन्यथा पितरांचा होईल अनादर

प्राण्यांना त्रास देऊ नका

मुक्या जनावरांना कधीही छळू नका. असहाय प्राण्यांना,व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो. विशेषत: सोमवती अमावस्येच्या दिवशी कावळा, कुत्रा, गाय, म्हैस इत्यादी प्राण्यांचा अपमान करू नये, ज्यामुळे

मुक्या जनावरांना खायला द्या

उन्हामुळे कासाविस झालेलो आपण पाणी पिताच तृप्त होतो. तेच पशु-पक्षी यांचे हाल होतात. पितृदोषासाठी या पक्षांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केल्याने पितृ शांत होतात. त्यांचे समाधान होते. त्या पक्षांच्या रूपात पितरांनाच अन्न पाणी दिले जाते. केवळ अमावस्येदिवशीच नाही तर इतर वेळीसाठीही प्राण्यांची सोय करा. (Somvati Amavasya)

Somvati Amavasya 2024
Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येला करा 'हे' 5 महादान, क्रोधित पितरही होतील प्रसन्न

भगवान शंकर माता पार्वतीची पूजा 

सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करा. यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने, कुंकू , शंख, नारळ आणि केतकीचे फूल अर्पण करावे.

Somvati Amavasya 2024
Somvati Amavasya 2023: मार्कंडेय पर्वतावरील सोमवती अमावस्या यात्रोत्सवास प्रशासनाकडून बंदी

या गोष्टी करा दान

सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावे. यामुळे तुमची आर्थिक संकटातून सुटका होते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर त्यांचा रागही निघून जातो.हिंदू धर्मात पिंड दान खूप महत्वाचे मानले जाते.

जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंड दान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंड दान करावे. याने पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात.

काळ्या तिळाचे दान

या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने फायदा होताो. सोमवती अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाचे दान अवश्य करावे. यामुळे पितरांचे दुष्कृत्यही दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो. यामुळे तुमची जीवनात प्रगती होते. तुम्ही मंदिरात काळे तीळ देखील दान करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com