esakal | कोरोनाच्या भीतीमुळे वडिलांना सोडलं भररस्त्यात; हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या भीतीमुळे वडिलांना सोडलं भररस्त्यात; हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल
कोरोनाच्या भीतीमुळे वडिलांना सोडलं भररस्त्यात; हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल
sakal_logo
By
शर्वरी जोशी

उतरत्या वयात मुलं आई-वडिलांचा आधार होतात असं कायम म्हटलं जातं. परंतु, वेळ, काळ आणि परिस्थिती कशी बदलेल याचा काही नेम नसतो. आयुष्यभर ज्या वडिलांनी मुलांचा सांभाळ केला असतो. त्याच आई-वडिलांना मुलं त्यांच्या उतारवयात वृद्धाश्रम किंवा घराबाहेरचा रस्ता दाखवतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे एका मुलाने त्याच्या वयोवृद्ध वडिलांना भररस्त्यात सोडून पलायन केलं आहे. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून अनेकांनी या मुलावर टीकास्त्र डागलं आहे.

सध्याच्या काळात कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येक जण हवालदिल झाला आहे.म्हणून सगळेच जण स्वत:ची काळजी घेत आहेत. मात्र, स्वप्रेमापोटी एका मुलाने वडिलांना भररस्त्यात सोडून दिलं. वयाच्या ८० व्या वर्षी हा इसम बेघर झाला असून दिल्ली पोलिसांनी त्याला आसरा दिला आहे.

हेही वाचा: हवेतील ऑक्सिजन व मेडिकल ऑक्सिजनमध्ये नेमका फरक काय?

आयएएस ऑफिसर अवनीश शरण यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल राजू राम यांनी एका ८० वर्षीय वृद्ध व्यक्ती रुग्णालयात दाखल केलं असून संबंधित घडलेला प्रकार सांगितला आहे.

हेही वाचा : Veg - Non veg; रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे पदार्थ

दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर येथे राहणारे ८० वर्षीय मुरलीधर त्यांच्या अखेरच्या दिवसात एकटे पडले होते. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांची साथ सोडली. काही दिवसांपूर्वी पोलिसांना एका व्यक्तीने फोन केला व त्यांच्या वडिलांना ताप येत असून परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर त्यांना कोरोना झाला असेल या भीतीपोटी आपण भेटण्यास जात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मुरलीधर एकटेच पडले होते. मुरलीधर यांची पत्नी त्यांच्या मुलीसोबत राहत होती.

फोन आल्यानंतर पोलिसांनी मुरलीधर यांच्या घराकडे धाव घेतली. विशेष म्हणजे या घरावर एक पत्र चिटकवण्यात आलं होतं. जे वाचल्यानंतर पोलिसांचं मनदेखील गहिवरून आलं. मृत्यू झाल्यानंतर माझा मृतदेह पोलिसांकडे सुपूर्द करा, असं त्यावर लिहिण्यात आलं होतं.

दरम्यान, कुटुंबियांनी साथ सोडल्यामुळे मुरलीधर पोलिसांसोबत येण्यास नकार देत होते. मात्र, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते तयार झाले व त्यांना दिल्लीतील राम मनोहर लोहिया या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.