Sonakshi sinha nude makeup : न्यूड मेकअपने लुक अजून क्लासी बनवा; सोनाक्षी देतेय टीप्स!

रेग्यूलर मेकअप ऐवजी न्यूड मेकअप करण्याकडे तरूणींचा कल
Sonakshi Sinha
Sonakshi Sinha

मेकअप आवडत नाही अशी कोणतीही स्त्री या जगात सापडणार नाही. यामूळेच मेकअप जगतात रोज नवे ट्रेंड येत आहेत. सध्या न्यूड मेकअपचा ट्रेंड आहे. त्यामूळे रेग्यूलर मेकअप ऐवजी न्यूड मेकअप करण्याकडे तरूणींचा कल आहे. तुम्हाला तुमच्या रोजच्या मेकअपची स्टाईल थोडी बदलायची आहे का? म्हणजे मेकअप तर करायचा आहे. पण तो थोडा हटके आणि वेगळा. मग तुम्ही सध्याच्या ट्रेंडनुसार ‘न्यूड मेकअप’ करायला हवा.

बॉलीवूड अभिनेत्रींपासून ते तुमच्या-आमच्यापर्यंत, लग्नापासून ते पार्ट्यांपर्यंत प्रयत्न सर्वत्रच न्यूड मेकअपवर भर दिला जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालाही न्यूड मेकअप आवडतो. त्यामूळे तूम्हालाही तिच्यासारखा मेकअप करायचा असेल आणि तुमचा लूक आकर्षक बनवायचा असेल. तर या टीप्स फॉलो करा

न्यूड मेकअप म्हणजे काय

न्यूड मेकअप म्हणजे असा मेकअप जो तुम्ही चेहऱ्यावर केला आहे असा पटकन दिसून येणार नाही. यालाच इंग्रजीमध्ये No Makeup Look असे म्हणतात. अगदी सौम्य स्वरुपातील हा मेकअप तुम्हाला कुठेही कधीही करता येतो. 

शिमर न्यूड मेकअप

आजकाल शिमर न्यूड मेकअपला खूप पसंती दिली जात आहे. त्यामूळे डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी आधी कन्सीलर सेट करा. यानंतर तुमच्या डोळ्यांच्या कडांवर तपकिरी रंगाचे लायनर लावा. यानंतर पापण्यांवर ब्राऊन रंगाचा फॉइल आयशॅडो लावा. फॉइल आयशॅडो लावण्यासाठी तुम्ही तुमच्या बोटांचा वापर करू शकता. तसेच, ओठांसाठी तपकिरी लिपस्टीक निवडा. हा मेकअप तूम्ही रात्री देखील करू शकता.

रेट्रो स्टाइल आयलायनर

आजकाल रेट्रो स्टाइल आयलायनरला खूप पसंती दिली जात आहे. यासाठी डोळ्यांवर ब्राऊन मॅट आयशॅडो वापरा. तुम्ही लिक्विड किंवा जेल आयलाइनरच्या मदतीने विंग लूक तयार करू शकता. तसेच, तुम्ही डार्क तपकिरी किंवा चॉकलेटी रंगाची लिपस्टीक वापरू शकता. असा लुक तुम्ही ब्राइट कलरच्या आउटफिटसह कॅरी करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com