
Maha Shivratri Temple Decoration: महाशिवरात्रीला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. यंदा २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. असं मानलं जातं की या दिवशी भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. हा दिवस शिवभक्तांसाठी खूप खास आहे. या दिवशी लोक मंदिरात जातात आणि पूजा करतात. ज्यांच्या घरात मंदिर आहे, ते घरीच पूजा करतात. तुम्ही महाशिवरात्रीला तुमच्या घरातील मंदिर खास पद्धतीने सजवू शकता.