

Sant Dnyaneshwar’s Explanation of Discriminative Wisdom
Sakal
डॉ. यशोधन साखरे
मानवाच्या आध्यात्मिक आणि आदिभौतिक जीवनाच्या समृद्धतेचा गाभा, पाया काय आहे?... याचा आपण साकल्याने विचार केला; तर त्याचे जे उत्तर येते ते ‘विवेक’. आपल्याला आपले पारमार्थिक आणि व्यावहारिक जीवन समृद्ध करायचे असेल, तर मानवाने विवेकाधिष्ठित जीवनप्रणाली अंगीकारली पाहिजे. पण त्यासाठी प्रथमतः विवेक म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. विवेक संज्ञेचा विचार करण्यापूर्वी या शब्दाचा विचार करणे आवश्यक आहे. विवेक शब्दात ‘विच्’ हा मूळ धातू आहे. त्याचा अर्थ पृथःकरण करणे असा आहे. या शब्दमर्यादेवरून विवेक या शब्दाचा अर्थ पृथःकरण असा निश्चित होतो.