

Sant Tukaram’s Life as Living Philosophy
Sakal
भागवत साळुंखे
दिवसामागून दिवस सरतात, महिन्यांमागे महिने जातात. पर्यायाने संपत्या वर्षाचा निरोप घेताना गलबलून जाणाऱ्या मनाला सावरत नव्या वर्षाचं स्वागत हे चक्र सुरूच असतं. जीवसृष्टीत पशुपक्ष्यांच्या तुलनेत मानवी जीवन खूप निराळं आहे. प्रत्येक माणूस काही ना काही योजना आखून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असतो. आपण केलेल्या संकल्पाच्या सिद्धीतील यशापशाचा लेखाजोखा ऋतू किंवा वर्ष बदलताना मांडला जातो. ठरवल्यापैकी किती गोष्टी घडल्या आणि किती अपुऱ्या राहिल्या, यावर मग समाधान व उद्विग्नता अवलंबून असते.