esakal | बटाट्याचं शास्त्रीय नाव काय? SSC CHSL परिक्षेतील सहा रंजक प्रश्न

बोलून बातमी शोधा

बटाट्याचं शास्त्रीय नाव काय? SSC CHSL परिक्षेतील सहा रंजक प्रश्न

या परिक्षांमध्ये विचारण्यात येणारे प्रश्नही तितकेच कठीण आणि गुंतागुंतीचे असतात.

बटाट्याचं शास्त्रीय नाव काय? SSC CHSL परिक्षेतील सहा रंजक प्रश्न

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सरकारी नोकरी मिळावी अशी अनेक तरुणांची इच्छा असते. त्यामुळे असे असंख्य तरुण स्पर्धा परिक्षांची तयारी करत असतात. या परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञान तपासलं जातं. त्यामुळे या परिक्षांमध्ये विचारण्यात येणारे प्रश्नही तितकेच कठीण आणि गुंतागुंतीचे असतात. अनेकदा या परिक्षेत असे काही भन्नाट प्रश्न विचारण्यात येतात, ज्याची उत्तरं कितीही विचार केला तरीदेखील पटकन सुचत नाहीत. असेच काहीसे प्रश्न Staff Selection Commission म्हणजेच SSCच्या परिक्षेत विचारण्यात आले आहेत. हे प्रश्न नेमके कोणते? आणि त्याची उत्तरं तुम्हाला माहित आहेत का ते पाहुयात.

नुकतीच SSC ची (CHSL Exam 2021) परिक्षा सुरु झाली असून ही परिक्षा १२ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. या परिक्षेतील चाचणी पेपर नुकताच समोर आला असून त्यात विचारण्यात आलेले प्रश्न अनेकांना सोडवता आले नाहीत. 

हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी खरंच जोडले नीता अंबानींसमोर हात?

प्र. जगातला सगळ्यात मोठं तरंगणारं सोलर पार्क कुठे आहे?

उ. मध्य प्रदेश.

प्र. शरयू नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं शहर कोणतं?

उ. अयोध्या.

प्र.  यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं शहर कोणतं?

उ. नवी दिल्ली.

प्र. जगातिक क्षयदिन कधी असतो?

उ. २४ मार्च.

प्र. बटाट्याचं शास्त्रीय नाव काय?

उ. Solanum Taberosum

प्र. सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळणारा खेळाडू कोणता?

उ. सचिन तेंडूलकर