Child Health : वयाच्या सहाव्या वर्षानंतरही तुमचं मूल बोबडं बोलतं का? हे उपाय नक्की करा ट्राय

वयाच्या सहाव्या वर्षानंतरही तुमचं मूल बोबडं बोलतं का?
health
health sakal

सुरुवातीला मुलांचे बोबडे बोल ऐकावेसे वाटतात. कानाला ते अगदी गोड वाटतात. पण मुल ४- ५ वर्षांचं झालं की त्याने स्पष्ट बोलावं असं वाटतं. तोतरेपणा किंवा बोबडेपणा ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या जबड्याच्या स्नायूंच्या कडकपणामुळे उद्भवते होते.

साधारणपणे, स्पष्ट बोलण्याची क्षमता 5 वर्षांपर्यंत विकसित होते, त्यामुळे 1 ते 5 वर्षे या वयात तोतरे किंवा बोबडे बोलणे हे सामान्य मानले जाते. मात्र ६ वर्षांनंतरही ही समस्या कायम राहिली तर ती चिंतेची बाब आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता, याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घेणेही खूप गरजेचे आहे.

जिभेचा व्यायाम

मुलांना जिभेचा व्यायाम करण्यास सांगा. जिभेच्या स्नायूंना ताण पडेल असे व्यायाम त्यांना द्या. जसे कि, जबडे शक्य तितके उघडणे. जिभेचे टोक वरच्या टाळूवर टेकवणे. जीभ बाहेर काढून स्थिर धरणे, या काही व्यायामामुळे समस्येत बराच आराम मिळेल.

health
Health Care News : ओठांवर वारंवार येतो घाम? काय असू शकतं कारण? जाणून घ्या उपाय

गाणं गायला सांगा

मुलाला सतत काही न काही बोलायला लावा, बोबडे आणि तोतरे मूल कमी बोलत असल्यामुळे त्याच्या जिभेची हालचाल खूप कमी होते. त्यामुळे त्याला गाणं गाण्याची सवय लावा, गाणं गायल्यानेही तोतरेपणा कमी होतो.

ओम मंत्राचा जप

सकाळी आणि संध्याकाळी मुलांना ओम मंत्राचा जप करण्यास सांगा. असे केल्याने मुलांना अध्यात्मिकतेची आवड निर्माण होईल, शिवाय तोतरेपणाची समस्या देखील कमी होईल.

हे घरगुती उपाय करून पाहा

देशी तूप

मुलाला रोज सकाळी एक चमचा देशी तूप द्या, ज्यामुळे त्याच्या जबड्यातील स्नायूंचा कडकपणा कमी होण्यास मदत मिळेल.

काळी मिरी

बोबडेपणापासून मुक्त होण्यासाठी काळ्या मिरीचे सेवन देखील प्रभावी ठरू शकते. दररोज मुलाला 3 काळी मिरी चघळण्यासाठी द्या. काळी मिरी खाण्यास आवडत नसेल तर बदाम आणि काळी मिरीची पावडर बनवा आणि साखरेसोबत हे मिश्रण 10 दिवस रिकाम्या पोटी खाल्ल्यानेही खूप आराम मिळेल.

स्पीच थेरपिस्टला भेटा

वरील सर्व उपाय करून देखील मुलांमधील तोतरेपणा कमी होत नसेल तर स्पीच थेरपिस्टला नक्की भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com