
- पृथा वीर
साडीच्या फॅशनबरोबर चर्चा होते ती ब्लाउजची. एकवेळ हवी ती साडी तुम्हाला सहज मिळेल; पण परफेक्ट फिटिंगचे ब्लाउज आणि तेही इतरांपेक्षा वेगळे किंवा ‘हटके’ डिझाइनचे ब्लाउज मिळणे खरोखरच अवघड गोष्ट आहे. ब्लाउज उत्तम असेल, तरच साडी छान दिसते. लग्नसराईच्या काळात तर आपला ब्लाउज इतरांपेक्षा उठून दिसावा, ही आपली धडपड असते. मग काही ‘स्टेटमेंट ब्लाउज’ तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात.