esakal | वयात येणाऱ्या मुलींना 'या' गोष्टी चुकूनही सांगू नका!
sakal

बोलून बातमी शोधा

वयात येणाऱ्या मुलींना 'या' गोष्टी चुकूनही सांगू नका!

वयात येणाऱ्या मुलींना 'या' गोष्टी चुकूनही सांगू नका!

sakal_logo
By
शर्वरी जोशी

वयाचं १६ वं वर्ष ओलांडलं की मुली वयात आल्या किंवा त्या मोठ्या झाल्या असं म्हटलं जातं. त्यामुळे या वयात मुलींसोबत त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलाविषयी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु, अनेक घरांमध्ये मुलींना या गोष्टी सांगितल्याच जात नाहीत. मग अशावेळी मुली विविध मार्गाने त्या गोष्टींचं आकलन करण्याचा प्रयत्न करतात. यात अनेकदा त्यांच्याकडून काही चुकादेखील घडतात. विशेष म्हणजे मासिक पाळी, लैंगिक जीवन याविषयी तर घरातील कर्ती स्त्रीदेखील मौन बाळगून असते.परंतु या विषयी मुलींना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे मासिक पाळी या मुद्द्यावर आजही आपल्याकडे दबक्या आवाजात चर्चा केली जाते. तसंच या मासिक पाळीची भीती मुलींच्या मनात घातली जाते. त्यामुळे वयात येण्यापूर्वीच या मुली दडपणाखाली दबून जातात. म्हणूनच, वयात येणाऱ्या मुलींशी बोलत असतांना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे ते आज जाणून घेऊयात. (stop-telling-these-things-to-young-girls-as-they-grow)

१. मासिक पाळी -

मासिक पाळीविषयी आजही आपल्याकडे अनेक गैरसमज आहे. पाळी अस्पृश्य असते. त्यामुळे त्या काळात स्त्रियांपासून दूर रहा वगैरे असे सल्ले घरातील मंडळींना दिले जातात. सोबतच या काळात स्वच्छतेकडेही दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे प्रथम मुलींना मासिक पाळीविषयी योग्य माहिती देणं गरजेचं आहे. त्यांच्या मनात भीती, घृणा ­निर्माण होईल असं कधीच त्यांना सांगू नका. तसंच मुलींना चुकीची माहिती देऊ नका. या काळात होणारे त्रास याविषयी त्यांना माहिती द्या.

हेही वाचा: राणीची भेट घेताना मोठमोठ्या नेत्यांनाही टाळाव्या लागतात 'या' गोष्टी

२. स्त्री मानसिकता -

मुलींना कायम त्यांच्या वागण्या-बोलण्यावरुन सल्ले दिले जातात. मुलगी असल्यामुळे असंच बस, असंच बोल असं कायम सांगितलं जातं. मात्र, कधीच मुलींना हे सल्ले देऊ नका. आज आपण सारेच पाहतोय की मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्वप्नांना बळ द्या. सतत त्यांना बंधनात ठेवणं किंवा तू मुलगी आहेस ही टॅगलाईन ऐकवू नका.

३. बॉडी शेमिंग -

सध्याच्या काळात सर्वात जास्त चर्चेत येणारा मुद्दा म्हणजे बॉडी शेमिंग. आज अनेक स्त्रियांना त्यांच्या रंगरुपावरुन ट्रोल केलं जातं. त्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत असतं. अनेकदा घरातदेखील मुलींना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीवरुन बोल लावले जातात. मात्र, तसं करु नका त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डगमगू शकतो.

४. तुला ते जमणार नाही-

अनेक घरांमध्ये मुलींना कायम डावललं जातं. अमूक काम करतांना तुला ते जमणार नाही, भावाला करु दे असा सल्ला मुलींना दिला जातो. परंतु, मुलींना हे असं कधीच सांगू नका. उलटपक्षी तुला ते जमेल, तुला करावं लागेल अस सांगून मुलींचा आत्मविश्वास कमी करु नये.

५. मुलांमध्ये भेदभाव -

मुलगा आणि मुलगी असा भेद आता राहिलेला नाही. मात्र, तरीदेखील अनेक घरांमध्ये आजही तो केला जातो. मात्र, असं कधीच करु नये मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद करु नका.

loading image
go to top