कधी एकदा ऑगस्ट महिन्यातला पहिला गुरुवार येतो आहे आणि कधी एकदा तुम्हा सर्वांबरोबर पुन्हा एकदा लेखाच्या माध्यमातून मी गप्पा मारते आहे असं मला झालं होतं. गेले पंधरा दिवस मी प्रचंड आनंदात होते.. आणि याचं कारण म्हणजे मी अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगमंचावर उभी राहत होते ‘लाभले आम्हास भाग्य’ या कार्यक्रमामधून.