
Happy Hormone Imbalance Symptoms: आपल्याला नेहमी आनंदी, ऊर्जावान आणि मानसिकदृष्ट्या स्थिर राहावं असं वाटतं, आणि यासाठी आपल्या मेंदूत काही विशिष्ट हार्मोन्स काम करत असतात. यांनाच आपण हॅप्पी हार्मोन्स म्हणतो. हे हार्मोन्स आपलं मूड, उत्साह, झोप आणि एकूण मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकतात. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयी हळूहळू या हार्मोन्सच्या नैसर्गिक निर्मितीला अडथळा आणतात?