करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी काम करत राहाणे, धडपडत राहाणे हा आपल्या धकाधकीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल साधत असताना होणाऱ्या ओढाताणीचा परिणाम म्हणून अनेकांना सातत्याने डोकेदुखीचा त्रास जाणवतो. ताणतणाव, अस्वस्थता, डोकेदुखी या सर्व दुखण्यांवर पारंपरिक योगाभ्यास हा रामबाण उपाय ठरू शकतो.
अधोमुख श्वानासन
हे आसन करताना एखाद्या कुत्र्याप्रमाणे आपली शरीरस्थिती असणे आवश्यक आहे. यासाठी दोन्ही हात खांद्यापासून सरळ रेषेत खाली पंजावर टेकवावेत. तसेच आपले पाय कंबरेच्या सरळ रेषेत गुडघ्यांवर टेकवावेत व डोके लोंबकळत्या अवस्थेत ठेवावे. हात आणि खांदे रुंदीच्या अंतरावर असले पाहिजेत आणि मग तुमचे गुडघे उचला आणि तुमची बोटे चटई किंवा जमिनीवर टेकवा. त्यानंतर गुडघे वर उचलून पावले जमिनीला पूर्ण टेकवावीत व डोके जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा.
पवनमुक्तासन
हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपावे व आपले गुडघे छातीजवळ आणावेत. आपला चेहरा गुडघ्यांजवळ आणावा. ६ ते ८ श्वास होईपर्यंत या स्थितीत राहावे. या आसनामुळे डोकेदुखी बरी होण्यास मदत होते. तसेच पोटाचे स्नायू बळकट होतात.
बालासन
या आसनामुळे छातीवरील ताण हलका होण्यास मदत होते. यासाठी गुडघ्यांवर बसून पाय मागच्या बाजूला एकमेकांना जोडावेत. हात पुढील बाजूस ताणत जमिनीला टेकवावेत आणि डोके गुडघ्यांना टेकवावे. ८ ते १० श्वास होईस्तोवर या स्थितीत राहावे. बालासनामुळे कोणत्याही प्रकारची डोकेदुखी बरी होते. मेंदू शांत करण्यास मदत होते. ताण आणि पाठदुखी कमी होते. नितंब आणि मांड्या ताणण्यासाठी याचा उपयोग होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.