‘आपल्या प्रिय मुलाचे हट्ट’ हा पालकांच्या डोकेदुखीचा आणि मुलांच्या प्रयोगशीलतेचा किंवा सर्जनशीलतेचा कस लावणारा प्रकार असतो; हे तुम्ही मान्य करालच. मुलांचे हट्ट करण्याचे जेवढे विविध कल्पक प्रकार आहेत, तेवढे हट्ट थांबवण्याचे तितकेच तुल्यबळ आणि कल्पक प्रकार पालकांना माहीत असतीलच असं वाटत नाही.