जुहूला म्हणजेच अगदी अमिताभचा जुना ‘प्रतीक्षा बंगला’ ते ‘जलसा’ आणि मग जे डब्ल्यू मॅरिएट रोड ते थेट खार रोड या संपूर्ण रस्त्यावर ड्राइव्ह करत जाताना बडे डिझायनर आणि स्टायलिस्ट यांचे शॉप्स बघत बघत मी दादरला डान्स रिहर्सलला पोहोचायचे. या रस्त्यावरून फिरताना मॅनेक्वीनवर घातलेले महागडे लेहेंगे, ड्रेस बघताना खरंच रमायला होतं.