Success Story :  पोरीनं नाव काढलं! सफाई कामगाराची मुलगी होणार डॉक्टर, वाचा तिची थक्क करणारी यशोगाथा  

19 वर्षीय प्रियाने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत नववा क्रमांक मिळविला
Success Story
Success Story esakal

Success Story :  आपल्या समाजात अशी एक प्रथा किंवा मोठा समज आहे की डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर व्हावं तर इंजिनिअरच्या मुलाने इंजिनिअर. या दोन्ही गोष्टी उच्चभ्रू असल्याने त्याच फारसं काह वाटत नाही. पण, जे लोक मोल मजोरी करून मुलांना शिकवतात, वाढवतात त्यांची इच्छा नक्कीच अशी नाही. की, त्यांच्या मुलांनीही मजूरी करावी, कोणाच्या तरी शेतात राबावे.

पण आपण हे विसरतो की, सामाजिक भान आणि सो कोल्ड केवळ दाखवण्या पुरते उच्च विचार असलेले लोक आजही समाजात आहेत. त्या लोकांना शिपायाच्या पोरानं शिपाईच व्हायला हवंय. असाच विचार ते करतात. असा विचार करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिलीय ती एका सफाई कामगाराच्या मुलीने. (Success Story : Success story of sweeper daughter becoming doctor)

Success Story
PSI Success Story : गरीबीवर मात करून कुटुंबाचा गाडा हाकता हाकता पतीच्या पाठिंब्यातून अनिता बनली पोलिस उपनिरीक्षक

होय, एका सफाई कामगाराची मुलगी लवकरच डॉक्टर होणार आहे. त्या मुलीची ही यशोगाथा प्रत्येक मुलाला प्रोत्साहन देईल जे अडचणी आणि कमतरता पाहून अस्वस्थ होतात. असे म्हणतात की उड्डाण पंखांनी होत नाही तर धैर्याने होते.

चंदिगडच्या सेक्टर 25 च्या गल्ल्यांमध्ये एका छोट्या खोलीत राहणाऱ्या एका सफाई कामगाराची मुलगी प्रियाने ही म्हण खरी ठरवली आहे. (Success Story)

लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रियाने आपल्या मेहनतीने आणि झोकून देऊन वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून आपले स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.

Success Story
PSI Success Story: रिक्षाचालकाच्या मुलीची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

सरकारी पॉलीक्लिनिकमधील सफाई कामगाराची 19 वर्षीय प्रियाने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत नववा क्रमांक मिळविला आणि सेक्टर 32 येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMCH) येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

सेक्टर 25 येथील जवाहर नवोदय विद्यालयात 6वी ते 12वीपर्यंत शिकलेल्या प्रियाने सांगितले की, सहावीपासूनच तिला डॉक्टर बनण्याचे स्वप्न पडू लागले. प्रियाचे वडील हनुमान प्रसाद सांगतात की, ती अनेकदा माझ्यासोबत पॉलीक्लिनिकमध्ये जायची आणि नेहमी डॉक्टरांना विचारायची की ते कोण आहेत. तेव्हापासून तो डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहू लागली होती. (NEET)

Success Story
PSI Success Story: रिक्षाचालकाच्या मुलीची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

बारावीनंतर तिला NEET कोचिंग घ्यायचे होते, पण चंदीगडमध्ये असलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूटची फी खूप जास्त होती. शेवटी पुण्यातल्या दक्षिणा फाउंडेशनमध्ये तिने प्रवेश घेतला. प्रियाने सांगितले की, तिथले तिचे वर्ग सकाळी ७ वाजता सुरू होते आणि संध्याकाळी ५ वाजता संपत होते. दरम्यान मोकळ्या वेळेत ती तिच्या शंका दूर करत असे.

प्रियाने सांगितले की मित्र, नातेवाईक आणि इतर कुटुंबातील सदस्यांची वृत्ती खूप सहकार्याची होती, सर्वांनी तिला प्रोत्साहन दिले. विशेषतः माझ्या शाळेतील पीटी इन्स्ट्रक्टर मुक्ता मॅडम. मार्शल आर्ट्सची सुवर्णपदक विजेती आणि राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू प्रिया GMCH कडून मिळालेला तिचा बॅच अभिमानाने दाखवते. कारण, ती लवकरच डॉक्टर प्रिया होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com