
Sudha Murthy Advises : नवरा अन् त्याचा विचित्र स्वभाव... असं नक्की काय सांगताय सुधा मूर्ती?
Relationship Tips : आपलं लग्न व्हावं, राजा राणीचा संसार असावा असं प्रत्येकीचं स्वप्न असतं, लग्नानंतर प्रत्येकाच आयुष्य बदलून जातं, एकेमकांना सांभाळून पुढे जावं लागतं. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला जागा देणं सोपं नसतं. त्यासाठी दोघांनाही खूप प्रयत्न करावे लागतात.
आपल्या जोडीदारामध्ये हवे असणारे गुण नसल्यास चिडचिड होते अशात सुधा मूर्तींनी एक पोस्ट शेयर केली आहे, यात त्यांनी आपल्याला कपल गोल्स सांगितल्या आहेत. जर तुम्हाला सुखी आयुष्य जगायचं असेल तर यासाठी लेखीका सुधा मूर्ती यांनी काही टिप्स दिल्या आहेत. बघूया सुधा मूर्ती काय म्हणताय?
स्वत:त बदल करा
सुधा मुर्तीं सांगतात की इतरांमध्ये बदल व्हावे अशी अपेक्षा असेल तर त्यासाठी आधी स्वत:मध्ये बदल करा. आयुष्यात संकट तर येतातच यासाठी स्वत:ला बदला. कारण समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा त्यांच्या विचारात बदल करण्यापेक्षा स्वत:मध्ये बदल केलेला केव्हाही चांगले आणि मुळात नसत्या अपेक्षा लोकांकडून ठेवण्यापेक्षा आपण आपलं बदलणं कधीही सोप्पं.
जोडीदार असं का वागतो आहे याचा विचार करा
तुमचा जोडीदार असं का वागतो आहे या गोष्टीचा विचार करा आणि तुम्हाला त्यांची कोणती गोष्ट आवडत नसेल तर तसं त्यांनी स्पष्टपणे सांगा यामुळे तुमचं नातं घट्ट होईल.