Suger Beauty Tips : पार्लरसारखा ‘ग्लो’ हवाय? साखरेचे हे पॅक्स करतील मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suger Beauty Tips

Suger Beauty Tips : पार्लरसारखा ‘ग्लो’ हवाय? साखरेचे हे पॅक्स करतील मदत

Face Beauty Tips : टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती बघून आणि पार्लरमध्ये तासंतास घालवून विकत घेतलेलं सौंदर्य किती काळ टिकतं हा एक गहन प्रश्नच आहे. कोणाचे तरी सल्ले ऐकून पार्लरमध्ये वेळ आणि पैसा खर्च करणाऱ्या तरुणी आज काही कमी नाहीत.पण, हे प्रत्येकीला परवडतच असं नाही.त्यामुळे आज आपण घरच्या घरी चेहऱ्याचा ग्लो परत कसा मिळवायचा हे जाणून घेऊयात.

हेही वाचा: Beauty Tips: कडूलिंबातील औषधी गुण वाढवतील तुमचं सौंदर्य

धूळ आणि प्रदूषण यामुळे चेहऱ्यावर काळा थर जमा होता.त्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यासाठीच घरच्या घरी साखरेच्या स्क्रबने चेहरा गोरा कसा बनवता येईल हे पाहूयात. बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा मध आणि साखर मिक्स करुन हा लेप चेहऱ्यावर लावावा. लेप सुकल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा प्रयोग एक दिवसाआड करावा. त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत होते.

हेही वाचा: Beauty Tips for Tanning : महागड्या पार्लर ट्रीटमेंटने नाही तर फक्त एक चमचा कॉफीने करा टॅनिंग दूर..

साखर – हळद

साखर आणि हळद पुड एकत्र बारीक करून घ्यावी.यात थोडा मध घातला तरी चालेल. याची एक घट्ट पेस्ट करून ती चेहऱ्याला १० मिनिट लावावी. आणि चेहरा धुवून टाकावा.

हेही वाचा: Beauty Tips : स्कीनटोननुसार कसा असावा मेकअप? पहा टिप्स

टोमॅटो - साखर

टोमॅटोच्या रसामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. दिवसातून एकदा रोज टोमॅटोच्या अर्ध्या फोडीवर साखर घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा.

हेही वाचा: Beauty Tips : डोळ्यांखाली काळी वर्तुळं वाढत्या वयाचे लक्षण; चिंता नको करा हे उपाय

ग्रीन टी – साखर

ग्रीन टीची पाने , साखर आणि बदाम तेल यांचे मिश्रण एकत्र करून पेस्ट बनवावी. ही पेस्ट हलक्या हातांनी चेहऱ्याला लावावी.

हेही वाचा: Beauty tips : काळवंडलेल्या पायांचे सौंदर्य परत कसे आणाल ?

लिंबू - साखर

लिंबूरस आणि साखर यांची एकत्र पेस्ट रात्री झोपताना चेहऱ्याला लावल्यास नक्कीच फरक दिसून येतो.

हेही वाचा: Beauty Tips : नखावर लवकर नेलपॉलिश वाळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या

हे सगळे प्रयोग एक दिवस केले आणि फरक नाही पडला म्हणून शांत राहू नका. चेहऱ्यावर सतत धूळ बसत असते त्यामुळे असे प्रयोग आठवड्यातून किंवा ४ दिवसातून एकदा नक्की करून बघा...