Summer Lehenga Designs : उन्हाळ्यात लग्न करताय? लेहेंग्याच्या 'या' डिझाईन्स नक्की करा ट्राय

Summer Lehenga Designs : आता उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. खास करून एप्रिल आणि मे महिन्यात अनेक लग्नांच्या तारखा आहेत.
Summer Lehenga Designs
Summer Lehenga Designsesakal

Summer Lehenga Designs : भारतात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात लग्नाचा सिझन मोठा असतो. या दोन्ही ऋतुंच्या काळात अनेक लग्ने पार पडतात. आता उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. खास करून एप्रिल आणि मे महिन्यात अनेक लग्नांचा शुभमुहूर्त आहे. उन्हाळ्यातील लग्न म्हटले की या दरम्यान लग्नात कोणत्या प्रकारचे आऊटफीट्स ट्राय करावेत? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो.

आजकाल लेहेंगा परिधान करण्यावर अनेक महिलांचा भर असतो. मेहंदी, हळद, संगीत आणि लग्न अशा खास कार्यक्रमासाठी विविध प्रकारचे लेहेंगे परिधान केले जातात. मात्र, उन्हाळ्यात लेहेंगा परिधान करायला काही महिलांचा नकार असतो. याचे कारण म्हणजे एकतर हेव्ही लेहेंगा आणि त्यात वातावरणातील प्रचंड उकाडा यामुळे, काही जणी लेहेंग्याऐवजी इतर आऊटफीट्सची निवड करतात.

मात्र, आता लेहेंग्यातही अनेक ट्रेंड्स पहायला मिळतात. आता उन्हाळ्यासाठी कंम्फर्टेबल असणारे आणि खास प्रकारच्या फॅब्रिक्सपासून बनवलेले विविध पॅटर्नमधील लेहेंगे मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. हे लेहेंगे विशेषत: उन्हाळ्यासाठी बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींचे काही असे लेहेंगा लूक्स दाखवणार आहोत, जे तुम्ही उन्हाळ्यात रिक्रिएट करू शकता.

Summer Lehenga Designs
Lehenga Tips : संगीत फंक्शनसाठी लेहेंगा खरेदी करण्यापूर्वी फॉलो करा ‘या’ खास टीप्स

साराचा फिशकट पर्ल लेहेंगा

फिशकट लेहेंग्याची क्रेझ आजकाल अभिनेत्रींमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळतेय. यामध्ये आता पर्ल फिशकट लेहेंग्याची ही भर पडली आहे. अभिनेत्री सारा अली खानने परिधान केलेला हा पर्ल फिशकट लेहेंगा डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केला होता.

साराने हा लेहेंगा एका लग्न समारंभात परिधान केला होता. या प्रकारचे लेहेंगे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील किंवा तुम्ही एखाद्या फॅशन डिझायनरकडून अशा प्रकारचा लेहेंगा डिझाईन करून घेऊ शकता.

या प्रकारचा लेहेंगा उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट आहे. हा लेहेंगा तुम्ही रात्री किंवा दुपारच्या लग्नासाठी परिधान करू शकता. या पर्ल लेहेंग्यावर संपूर्णपणे मोत्यांचे वर्क करण्यात आले आहे. तुम्ही यावर मॅचिंग पर्ल ज्वेलरी घालून लूक आणखी हटके बनवू शकता.

प्रिंटेड लेहेंगा

उन्हाळा आणि प्रिंटची फॅशन हे कॉंम्बिनेशन अप्रतिम आहे. उन्हाळ्यात अनेक जण प्रिंटचे कपडे परिधान करण्यावर भर देतात. उन्हाळ्यातील लग्नसमारंभासाठी तुम्ही प्रिंटेड लेहेंग्याची निवड करू शकतात. खास उन्हाळ्यातील प्रिंटेड लेहेंग्यासाठी तुम्हाला रॉ-सिल्क, शिफॉन, ऑर्गेन्झा इत्यादी फॅब्रिक्समधील लेहेंगे मार्केटमध्ये सहज मिळू शकतील. या प्रकारचे लेहेंगा लाईटवेट असतात आणि दिसायला ही आकर्षक दिसतात.

अभिनेत्री क्रिती सेनॉनने हा पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा परिधान केला आहे. यावर तिने लाईटवेट ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप कॅरी केला आहे. त्यामुळे, तिचा लूक आणखी सुंदर दिसतोय. तुम्ही सुद्धा क्रितीप्रमाणे या प्रकारच्या लेहेंग्याची निवड करू शकता. हळदीसाठी किंवा संगीत समारंभासाठी तुम्ही या प्रकारचा लेहेंगा परिधान करू शकता.

Summer Lehenga Designs
Alia Bhatt Party Looks : पार्टीमध्ये हटके दिसायचंय? मग, आलिया भट्टचे 'हे' ट्रेंडी लूक्स नक्की करा ट्राय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com