Summer Care: तुम्हीही उन्हाळ्यात घामामुळे त्रस्त आहात? मग 'या' सोप्या टिप्सने मिळवा सुटका

Summer Care: उन्हाळ्यात घामावर नियंत्रण ठेवायचे असेल तर काय करावे हे जाणून घेऊया.
Summer Care
Summer CareSakal

follow these tips to avoid sweat in summer season

उन्हाळ्यात अनेकदा लोकांना घामाचा खुप त्रास होतो. या दिवसांमध्ये वाढते तापमान आणि वातावरणातील बदलामुळे लोकांना घाम येतो. घाम येणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतू शरीराची स्वच्छ न ठेवल्यास त्वचेचे आजार आणि संसर्ग वाढू शकतात. तसेच घामाच्या दुर्गंधीमुळे लोक जवळ येत नाहीत. उन्हाळ्यात घामावर नियंत्रण ठेवायचे असेल तर काय करावे हे जाणून घेऊया.

  • फेस मास्क

उन्हाळ्यात फेस मास्क वापरल्याने त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहण्यास मदत मिळते. यामुळे मुरूम आणि घाम यासारख्या समस्यांपासून बचाव होतो.

  • हायड्रेट राहा

शरीरातील पाणी घामाद्वारे बाहेर पडते. यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. विशेषत: उन्हाळ्यात भरपुर पाणी प्यावे. शरीराला थंडावा मिळेल अशा शीतपेयांचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही लिंबू पाणी, कोकम शरबत,ताक यासारख्या पेयांचे सेवन करू शकता.

  • व्यायाम

उन्हाळ्यात घामावर नियंत्रण ठेवायचे असेल तर योगा करावा. तसेच त्याच्या दुर्गंधापासून मुक्ती मिळते. योगा किंवा जीममधून आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करावी. यामुळे घाम कमी येतो.

Summer Care
Kitchen Hacks: रवा जास्त काळ कसा साठवायचा? वाचा एका क्लिकवर
  • आरामदायी कपडे घालावे

उन्हाळ्यात सुती आणि सैल कपडे घालावे. यामुळे घामावर नियंत्रण राहते. तसेच उन्हाळ्यात लाइट रंगाचे कपडे घालावे. डार्क रंगाचे कपडे घालणे टाळावे. यामुळे सुर्याच्या अतिनिल किरणांपासून बचाव होतो.

  • आंघोळ करावी

उन्हाळ्यात घामावर नियंत्रण ठेवायचे असेल तर रोज थंड पाण्याने आंघोळ करावी. उन्हाळ्यात घाम, दुर्गंधी, मृत पेशी यापासून सुटका हवी असेल तर रोज सकाळी आणि शक्य असल्यास संध्याकाळी देखील आंघोळ करावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com